सातारा - कराड शेती उत्पन्न बाजार समिती आणि शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने कराडमध्ये गेली १६ वर्षे 'यशवंत कृषी, औद्योगिक आणि पशु-पक्षी' प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रदर्शनात १ टन वजनाचा रेडा, आंध्र प्रदेशातील 'पोंगणूर' जातीची शेळीएवढ्या उंचीची गाय आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
हेही वाचा - प्रज्ञासिंह यांचे पुन्हा नथूराम गोडसे प्रेम.. संबोधले 'देशभक्त', लोकसभेत गदारोळ
यंदाच्या प्रदर्शनात विविध कंपन्यांचे नाविन्यपूर्ण स्टॉल लावण्यात आले आहेत. गीर, देशी खिलार जातीच्या गाई, संकरीत आणि पंढरपुरी म्हैसेनेही शेतकर्यांचे लक्ष वेधले आहे. तीन दिवसांत सुमारे 8 लाख लोकांनी प्रदर्शनाला हजेरी लावली आहे.
हेही वाचा - सोशल मीडियावर भन्नाट मीम्स... मी पुन्हा येईन वरुन फडणवीस ट्रोल तर पवारच चाणक्य
माजी सहकार मंत्री विलास पाटील-उंडाळकर यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. परदेशी कंपन्यांनीही या प्रदर्शनात स्टॉल्स लावले आहेत. आधुनिक पध्दतीची शेती औजारे, खते, बियाणे, यंत्रे पाहण्यासाठी बळीराजा गर्दी करत आहे. ऊस, फुले, फळे, पशु, पक्ष्यांच्या स्पर्धा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक या प्रदर्शनाला भेट देत आहेत. श्वान प्रदर्शनातील विविध जातींचे श्वान पाहण्यासाठी तसेच त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता आहे.
हेही वाचा - सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकले, एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त कृषी प्रदर्शन आयोजित केले जात असल्यामुळे दरवर्षी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात येते. यंदा राजकीय पेचप्रसंगामुळे मुख्यमंत्र्यांऐवजी प्रगतशील शेतकर्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.