महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 27, 2021, 10:16 PM IST

ETV Bharat / state

वेतन थकवल्याने जम्बो कोविड सेंटरच्या सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन

जिल्हा प्रशासनाने जम्बो कोविड सेंटर कंत्राटदाराला चालवायला दिले आहे. या सेंटरवर सुमारे 45 सफाई कामगार काम करतात. मे महिना संपत आला तरी एप्रिल महिन्याचा पगार दिला नाही, असा कंत्राटदाराचा आरोप आहे. 'या कामगारांचे हातावर पोट आहे. वेळेवर पगार न मिळाल्याने ते अडचणीत आले आहेत. घर भाडे, कर्जाचे हप्ते थकले आहेत. वेळेवर पगार न मिळाल्यास खर्च भागवण्यासाठी कुठुन पैसे आणायचे,' असा सवालही या कामगारांनी केला.

agitation-of-cleaning-staff-in-jumbo-covid-center-in-satara
वेतन थकवल्याने जम्बो कोविड सेंटरच्या सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सातारा- गेल्या महिन्याचा पगार देण्यास उशीर झाल्याने जम्बो कोविड सेंटरमधील कंत्राटी वॉर्डबॉय व सफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगड मारल्याने एका गाडीची काच फुटल्याने काही काळ तणाव होता.

वेतन थकवल्याने जम्बो कोविड सेंटरच्या सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन

एप्रिल महिण्याचा पगार थकला

जिल्हा प्रशासनाने जम्बो कोविड सेंटर कंत्राटदाराला चालवायला दिले आहे. या सेंटरवर सुमारे 45 सफाई कामगार काम करतात. मे महिना संपत आला तरी एप्रिल महिन्याचा पगार दिला नाही, असा कंत्राटदाराचा आरोप आहे. 'या कामगारांचे हातावर पोट आहे. वेळेवर पगार न मिळाल्याने ते अडचणीत आले आहेत. घर भाडे, कर्जाचे हप्ते थकले आहेत. वेळेवर पगार न मिळाल्यास खर्च भागवण्यासाठी कुठून पैसे आणायचे,' असा सवालही या कामगारांनी केला.

संतप्त कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकाची फोडली गाडी

मुख्य ठेकेदारालाच काही तांत्रिक कारणामुळे देयक न मिळाल्याने ठेकेदारांच्या माध्यमातून मिळणारे वेतन कामगारांना न मिळाल्याने अडचण झाली आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे जम्बो कोविड सेंटरमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरापर्यंत जंबो व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यात चर्चा सुरू होती. संतप्त सफाई कामगारांनी जम्बोच्या आवारात व्यवस्थापनाचा तीव्र निषेध केला. याच वेळी रुग्णालय व्यवस्थापकाची गाडी पार्किंगमध्ये उभी होती. या गाडीची दर्शनी काच फोडण्याचा प्रकार झाल्याने तणाव वाढला. यावेळी रुग्णालय व्यवस्थापन आणि सफाई कर्मचारी यांच्यात जोरदार वादावादी झाली. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांत अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details