महाराष्ट्र

maharashtra

Afzalkhan Tomb Controversy : छत्रपतींनी कोथळा काढलेल्या अफझलखानाच्या कबरीवरुन वाद, कडक सुरक्षा तैनात

By

Published : May 25, 2022, 5:46 PM IST

Updated : May 25, 2022, 7:10 PM IST

Afzalkhan Tomb Controversy : औरंगाबादमध्ये पहिलांदा मुघल शासक औरंगजेबाच्या कबरीवरून वाद ( Aurangzeb Tomb Controversy ) झाला होता. सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी बांधलेल्या अफझलखानाच्या कबरीवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे.

Afzalkhan Tomb Controversy
अफझलखानाच्या कबरीवरुन वाद

मुंबई -महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांत लाऊडस्पीकर ( Loudspeaker Controversy ), हनुमान चालिसा ( Hanuman Chalisa ) आणि मशिदीवरून ( Masjid Temple Controversy ) गदारोळ झाला होता. मात्र, आता महाराष्ट्रात कबरीवरून खळबळ उडाली आहे. औरंगाबादमध्ये पहिल्यांदा मुघल शासक औरंगजेबाच्याकबरीवरून वाद झाला होता. सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी बांधलेल्या अफझलखानाच्या कबरीवरून आता नवा वाद ( Afzalkhan Tomb Controversy ) निर्माण झाला आहे. यापूर्वी औरंगाबाद येथील औरंगजेबाच्या समाधीस्थळी पोलिसांनी खबरदारीच्या दृष्टीने कडक बंदोबस्त ठेवला होता. यापूर्वी मनसेने इशारा दिला होता की, ज्यामध्ये सरकारने ही समाधी पाडली नाही तर आमचे कार्यकर्ते हे काम करतील, असे म्हटले होते.

आता अफझलखानाच्या कबरीचेही छावणीत रूपांतर झाले आहे. वाराणसीतील ज्ञानवापी मशीद आणि मंदिरावरून सुरू असलेल्या वादाशिवाय राज ठाकरेंच्या अफझलखानाबाबतच्या वक्तव्यानंतर पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनानेही हे पाऊल उचलले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तेथे तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

अफझलखानच्या कबरीच्या निगराणीसाठी QRT -कबर परिसरातील भागात जातीय वातावरण बिघडवण्याचा कट रचला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर परिसराची पाहणी करण्यात आली. या वेळी रॅपिड अॅक्शन फोर्सची 102 बटालियन आणि 15 क्यूआरटी जवान कबरीवर उपस्थित होते. त्याचवेळी महाबळेश्वर पोलीस, नवी मुंबई जलद कृती दलाचे ( क्यूआरटी ) जवानही या काळात कबरीभोवती तैनात होते. या पाहणीनंतर महाबळेश्वरमधील विविध समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशीही अधिकाऱ्यांनी चर्चा केली. यासोबतच त्यांना सतर्क राहून शांतता राखण्याचे आवाहनही करण्यात आले होते.

अकबरुद्दीन आवेसीने औरंगजेबाच्या कबरीवर वाहिली होती फुले - काही दिवसांपूर्वी एआयएमआयएमचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांसह औरंगाबादमधील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. तेथे त्यांनी समाधीचे दर्शन घेऊन फुले वाहिली होती. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून बराच वाद झाला होता. ज्या औरंगजेबाने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. हे लोक त्यांच्या समाधीवर जाऊन फुलांचे हार घालत आहेत आणि महाराष्ट्र शांत बसला आहे. सरकारने ही कबर पाडली नाही तर आमचे कार्यकर्ते ते पाडतील. मनसेच्या या इशाऱ्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव औरंगजेबाच्या कबर पाच दिवसांसाठी पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती. या संबंधीची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. आता ती कबर परिसरात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली असून पाच दिवसांनंतर पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे.

Aurangzeb : दिल्लीचा शहेनशहा औरंगजेबाची का आहे खुलताबादेत कबर, जाणून घ्या सविस्तर माहिती

राज ठाकरेंचा अफजल खानावरून शरद पवारांवर निशाणा - एमआयएम नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी ( MIM leader Akbaruddin Owaisi ) हे औरंगाबादेत शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी खुलताबाद येथील दर्गा आणि औरंगजेब यांच्या कबरीला भेट ( Akbaruddin Owaisi Visit Dargahs Khultabad ) दिली व कबरीवर फुले वाहिली होती. यावरुन राज ठाकरे यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका केली होती. “आमच्याच महाराष्ट्रात एमआयएमची औलाद येते आणि जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी आग्र्याहून निघाला त्या औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवतात. आणि आम्हाला लाज वाटत नाही. सत्ताधारीच असे बसले आहेत. आता आमच्या शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल, तर यापलीकडे काय बोलायचं? अफजलखान शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता म्हणे. तो साम्राज्य विस्ताराला आला होता. मग शिवाजी महाराज काय त्याच्या रस्त्यात गेले का?” असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर मनसैनिकही आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला होता अफजलखानाचा कोथळा -औरंगजेबाची प्रकृती ही खालावत असताना त्यांची आई बडी बेगम साहिबा ही प्रशासन सांभाळत होती. त्यांनी आपल्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा वध करण्यासाठी विडा ठेवला होता. त्यावेळी अफझलखान याने भर दरबारात तो विडा उचलला होता. अफझलखान हा मोठा फौजफाटा घेऊन विजापूरहून जून १६५९ मध्ये निघाला होता. शिवाजी महाराजांना खान येत असल्याची खबर मिळाली होती. त्यांनी आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेल्या प्रतापगड किल्ल्यावर हलवला होता.

महाराजांनीच बांधली अफझलखानाची कबर - अफझलखानाच्य सैन्यात अनेक सरदारांचा समावेश होता. त्यातील काही प्रमुख सय्यद बंडा, फाजलखान, अंबरखान, याकुतखान, सिद्दी हिलाल, मुसाखान तसेच काही मराठे सरदार पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी इत्यादी जे आदिलशाहीत चाकरीला होते. त्याच्या फौजेत १२,००० च्या घोडदळाचा समावेश होता. तसेच १०,००० पायदळ तसेच १,५०० बंदूकधारी सैनिक, ८५ हत्ती व १,२०० ऊंटांचा समावेश होता. तसेच ८० ते ९० तोफा होत्या. शिवाजी महाराजांनी आपले दूत पाठवून खानाला आपण घाबरलो असल्याचे दाखवून खानाशी प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरवली होती. मात्र या भेटी दरम्यान खानाने दगा केलेला पाहून शिवाजी महाराजांनी वाघनखे काढली व खानाच्या पोटात घुसवून त्याचा कोथळा बाहेर काढला. अनपेक्षित प्रतिवाराने भेदरलेल्या खानाने दगा-दगा... असा आक्रोश केला व इतर अंगरक्षकांना सावध केले. इतर अंगरक्षकांच्यात तिथेच जुंपली. सय्यद बंडाने शिवाजी महाराजांनवर वार केला परंतु तो जिवा महालाने आपल्यावर घेतला व शिवाजी महाराजांचा रस्ता मोकळा केला. इकडे खान त्याच्या पालखीत स्वार झाला परंतु संभाजी कावजीने प्रथम पालखी वाहणाऱ्या भोईंचे पाय तोडले व जखमी अफजलखानाला मारून त्याचे शीर धडापासून अलग केले होते. याच ठिकाणी प्रतापगडावर अफझलखानाची कबर बांधण्याचे आदेश शिवाजी महाराजांनी दिले होते. आणि तिथेच त्याची कबर बांधण्यात आलेली आहे.

हेही वाचा - Afzal Khan Tomb Security : प्रतापगड पायथ्याशी असणाऱ्या अफजल खानच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ

Last Updated : May 25, 2022, 7:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details