महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Afzal Khan Syed Banda Graves : अफजलखान आणि सय्यद बंडाची कबर अतिक्रमणमुक्त, पाहा फोटो - अफझलखान कबर

( Afzal Khan and Syed Banda Graves ) किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखान कबरीच्या परिसरातील अतिक्रमण पाडण्याच्या कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी असल्याने अतिक्रमणात निघालेले साहित्य उचलण्याचे काम थांबवले आहे. मात्र, अफझलखान व सय्यद बंडा या दोघांच्या कबरी मोकळ्या झाल्या आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 11, 2022, 7:04 PM IST

Updated : Nov 11, 2022, 7:30 PM IST

सातारा : किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखान कबरीच्या परिसरातील अतिक्रमण पुर्णत: जमीनदोस्त करण्यात आली आहेत. त्यामुळे अफजलखान आणि सय्यद बंडा यांची कबर ( Afzal Khan and Syed Banda Graves ) आता स्पष्टपणे दिसत आहे. अतिक्रमणे काढल्यानंतर निघालेला राडारोडा उचलण्याचे काम सुरू होते. मात्र, अतिक्रमण पाडण्याच्या कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी असल्याने अतिक्रमणात निघालेले साहित्य उचलण्याचे काम थांबवले आहे. मात्र, अफझलखान व सय्यद बंडा या दोघांच्या कबरी मोकळ्या झाल्या आहेत.

पाहा फोटो -

अफजलखान आणि सय्यद बंडा यांच्या कबरीचा अतिक्रमणापूर्वी असा दिसत होता परिसर
अतिक्रमणे काढल्यानंतर आता असा दिसत आहे अफजलखान कबरीचा परिसर
अतिक्रमणे काढल्यानंतर आता अफजल खान आणि सय्यद बंडाच्या कबरी अशा उघड्या दिसत आहेत
अतिक्रमणे काढल्यानंतर निघालेले साहित्य.
अतिक्रमणे काढल्यानंतर निघालेले साहित्य.

प्रशासनाने गोपिनियता बाळगत केली कारवाई - प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजलखान कबरीच्या परिसरात झालेल्या अतिक्रमाणावर अखेल सातारा जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. अफजलखान वध दिनी बुलडोझर फिरवत सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. अत्यंत गोपनीयता बाळगत प्रशासनाने आज पहाटे ही कारवाई केली आहे. (Encroachment near Afzal Khan grave) सध्या प्रतापगड परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. तसेच, कबर परिसराकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे प्रतापगड परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई - कबरीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी प्रशासनाने काल (दि. 9 नोव्हेंबर)रोजी बुधवारी रात्रीपासूनचं मोठी तयारी केली होती. चार जिल्ह्यातील 1600 पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला होता. हे पोलीस रात्रीच प्रतापगड परिसरात दाखल झाले होते. तसेच, अवजड यंत्रसामग्री प्रतापगडाकडे जात होती. महाबळेश्वरच्या बाजारपेठेत देखील पोलिसांची गस्त सुरू होती. त्यामुळे प्रशासनाकडून कसल्या तरी हालचाली सुरू असल्याची चाहूल स्थानिकांना लागली होती. मात्र, अत्यंत गोपनीयता बाळगत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पहाटे प्रशासनाने कबरीच्या परिसरातील अतिक्रमणे भुईसपाट केली आहेत.

Last Updated : Nov 11, 2022, 7:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details