महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पत्नीशी भांडण झाल्यानंतर गड्याने पेटवली दहा घरं, परिसराला अग्नितांडवाचे स्वरुप;व्हिडिओ व्हायरल

सातारा जिल्ह्यातील माजगावमध्ये सोमवारी सायंकाळी भीषण घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीशी भांडण करत पतीने स्वत:च्याच घराला आग लावली. दरम्यान, येथील पाटील वाड्यातील नऊ घरेही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यामुळे एकूण दहा घरे येथे आगीत भस्मसात झाली आहेत. यामध्ये लाखो रुपयांची हानी झाली आहे. याप्रकरणी मल्हारपेठ पोलिसांनी संजय रामचंद्र पाटील या व्यक्तिला अटक केली आहे.

पत्नीशी भांडण झाल्यानंतर गड्याने पेटवली दहा घर
पत्नीशी भांडण झाल्यानंतर गड्याने पेटवली दहा घर

By

Published : Oct 19, 2021, 12:25 PM IST

सातारा (कराड) - पाटण तालुक्यातील माजगावमध्ये सोमवारी सायंकाळी भीषण घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीशी भांडण करत पतीने स्वत:च्याच घराला आग लावली. दरम्यान, येथील पाटील वाड्यातील नऊ घरेही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यामुळे एकूण दहा घरे येथे आगीत भस्मसात झाली आहेत. यामध्ये लाखो रुपयांची हानी झाली आहे. याप्रकरणी मल्हारपेठ पोलिसांनी संजय रामचंद्र पाटील या व्यक्तिला अटक केली आहे.

व्हिडिओ

दारूच्या नशेत घराला लावली आग

संजय रामचंद्र पाटील यास दारूचे व्यसन आहे. काल (सोमवारी) सायंकाळी तो दारू पिऊन घरी आला. चारित्र्याचा संशय घेऊन त्याने पत्नीशी भांडण केले. त्यानंतर दारूच्या नशेत त्याने पाटील वाड्यातील स्वत:च्या घराला आग लावली. आगीमुळे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि आगीने रौद्ररुप धारण केले. या घटनेत पाटील वाड्यातील सर्व दहा जणांची घरे आगीत जळून खाक झाली.

पत्नीशी भांडण झाल्यानंतर गड्याने पेटवली दहा घर

नळ योजनेचे पाणी सोडले

माजगावात जुना पाटीलवाडा आहे. या वाड्यात दहा कुटुंबे राहतात. त्यामध्ये संजय पाटील याचेही घर आहे. त्याने लावलेल्या आगीमुळे संपूर्ण पाटील वाडाच आगीत सापडला. त्यामुळे आग विझविण्यासाठी संपूर्ण गाव एकवटला. पाटण तालुका खरेदी-विक्री संघ, सह्याद्रि कारखाना तसेच जयवंत शुगर कारखान्यांचे अग्निशामक बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तोपर्यंत ग्रामपंचायतीने गाव नळ योजनेला पाणी सोडले. तरूणांनी नळाच्या पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळात अग्निशमन दलाचे बंबही दाखल झाले. त्यामुळे दोन तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परंतु, आगीत दहाही घरे खाक होऊन लाखो रुपयांची हानी झाली आहे.

पत्नीशी भांडण झाल्यानंतर गड्याने पेटवली दहा घर

संसारोपयोगी साहित्यासह दागिनेही जळाले

माजगाव येथील पाटील वाड्यात चंद्रकांत पाटील, स़भाजी पाटील, ज्ञानदेव पाटील, पांडूरंग पाटील, दत्तात्रय पाटील, कृष्णत पाटील, आनंदराव पाटील, सुहास पाटील रमेश हिमणे यांची घरे होती. या आगीत संसारोपयोगी साहित्यासह दागिने आणि रोख रक्कमही जळाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संशयीत संजय पाटील यास अटक केली आहे. मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर हे या घटनेचा तपास करत आहेत.

हेही वाचा -मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये हिजाब घातलेल्या महिलेला प्रवेश नाकारला; व्हिडिओ व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details