महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मी तर छत्रपती उदयनराजेंचा फॅन - आदित्य ठाकरे - पाटण विधानसभा मतदारसंघ

लोकांची सेवा करून उदयनराजे अणि देसाई निवडून आले आहेत. मी तर महारांजांचा चाहता आहे. त्यामुळे मी त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. माझे भाग्य आहे, मला त्यांच्या शेजारी बसण्याची संधी मिळाली, अशी स्तुती आदित्य ठाकरे यांनी केली.

पाटण येथील सभेत बोलताना आदित्य ठाकरे

By

Published : Oct 13, 2019, 4:15 AM IST

सातारा - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार शंभुराज देसाई व सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांची पाटण येथे प्रचार सभा घेतली.

लोकांची सेवा करून उदयनराजे अणि देसाई निवडून आले


येथील आमदार-खासदारांसाठी मी प्रचार करण्याची गरज नाही. लोकांची सेवा करून उदयनराजे अणि देसाई निवडून आले आहेत. मी तर महारांजांचा चाहता आहे. त्यामुळे मी त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. माझे भाग्य आहे, मला त्यांच्या शेजारी बसण्याची संधी मिळाली, अशी स्तुती आदित्य ठाकरे यांनी केली.

हेही वाचा - हा महाराष्ट्र मला तरुणांच्या हाती द्यायचाय - शरद पवार


आत्तापर्यंत येथे राष्ट्रवादी जिंकायची आता राष्ट्रवाद जिंकेल. सध्याचे केंद्रातील सरकार जगात सर्वात मोठे आहे. उदयन महाराज आले की, ते आणखी मोठे होईल, असा विश्वास आदित्यने व्यक्त केला. काँग्रेस, राष्ट्रवादीला लोकांनी स्वत: नाकारले आहे.
मी देखील महारांजासारखी कमिटमेंट करतो, मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. येथे मी स्वत:साठी आलो आहे. मला आपले आशिर्वाद द्या, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी मतदारांना साद घातली.

ABOUT THE AUTHOR

...view details