सातारा :साताऱ्याची तिरंदाज आदिती स्वामी अवघ्या 17 व्या वर्षात वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे. जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात तिने शनिवारी सामन्याच्या अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिला पराभूत केले. अँड्रियाला पराभूत करत आदितीने सीनियर वर्ल्ड चॅम्पियनचे शीर्षक तिच्या आपल्या नावावर केले. वैयक्तिक सुवर्णपदक पटकावल्यानंतर साताऱ्याच्या गोल्डन गर्ल आदिती स्वामीवर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे. तिच्या पालकांचे अभिनंदन करण्यासाठी घरी मान्यवरांची रिघ लागली आहे. जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळाले आहे.
सातार्याच्या क्रीडा क्षेत्रात उत्साह :आदितीने ज्युनियर स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यानंतर दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत बर्लिनमधील जागतिक तिरंदाजी स्पर्धेच्या कंपाऊंड महिलांच्या अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेराला पराभूत करून तिने विश्वविजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत अँड्रिया बेक्वेरा हिचा आदितीने (149-147) असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. 17 वर्षीय आदिती स्वामी ही वैयक्तिक स्पर्धेत जागतिक स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय तिरंदाज ठरली आहे. तिच्या यशानंतर देशासह सातार्यातील क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. आदितीच्या यशामुळे देशाच्या पदक तक्त्यास आणि देशाच्या लौकीकास चार चाँद लागले आहे, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विजयाच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले आहे.