महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कराडमध्ये बर्निंग बाईकचा थरार, अ‍ॅक्टिव्हा जळून खाक - Activa bicycles burned at Karad Market

कराडमधील मुख्य बाजारपेठ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीने शनिवारी दुपारी अचानक पेट घेतला. या आगीत दुचाकी संपूर्ण जळून खाक झाली. पार्किंग केलेली गाडी पेटल्याने बाजारपेठ रस्त्यावर आणि दत्त चौकात खळबळ उडाली.

Activa bicycles burned at Karad Market
कराडमध्ये बर्निंग बाईकचा थरार

By

Published : Dec 14, 2019, 11:34 PM IST

सातारा -कराडमधील मुख्य बाजारपेठ रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीने शनिवारी दुपारी अचानक पेट घेतला. या आगीत दुचाकी पुर्णतः जळून खाक झाली. पार्किंग केलेली गाडी पेटल्याने बाजारपेठ रस्त्यावर आणि दत्त चौकात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कराड नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर आग विझवण्यात यश आले.

हेही वाचा... दूध महागले! मदर डेअरीकडून प्रति लिटर ३ रुपयांची दरवाढ

कराडच्या मुख्य बाजारपेठ रस्त्यावरील दत्त चौक परिसरात एकजण आपली अ‍ॅक्टिव्हा गाडी रस्त्याच्या कडेला पार्क करून दुकानात गेला होता. काही वेळाने गाडीतून धूर येऊ लागला आणि क्षणार्धात गाडीने पेट घेतला. थोड्या वेळातच ती दुचाकी आगीत जळून खाक झाली. पेटत्या दुचाकीच्या थरारामुळे दत्त चौक ते आझाद चौक या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नागरिकांनी या घटनेची माहिती कराड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर आग विझवण्यात आली.

हेही वाचा... भाजप नेते संबित पात्रांनी राहुल गांधींचं ठेवलं नवं नाव, म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details