महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 19, 2021, 3:08 PM IST

ETV Bharat / state

कोरोना नियमांचे उल्लंघन; कराडमध्ये दोन दिवसांत 294 जणांवर कारवाई करुन 4 लाखांचा दंड वसूल

संचारबंदीमुळे कराडमधील विजय दिवस चौक, सैदापूर कॅनॉल, भेदा चौक, कोल्हापूर नाका, कार्वे नाका व ढेबेवाडी फाटा याठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून बंदोबस्तही तैनात आहे.

karad corona
कराड कोरोना

कराड (सातारा) -कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कराड शहर पोलिसांनी गेल्या दोन दिवसात नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनधारक, आस्थापनांवर कारवाई केली आहे. तसेच 4 लाख 13 हजार 200 रूपयांचा दंड वसूल केला.

संचारबंदीमुळे कराडमधील विजय दिवस चौक, सैदापूर कॅनॉल, भेदा चौक, कोल्हापूर नाका, कार्वे नाका व ढेबेवाडी फाटा याठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून बंदोबस्तही तैनात आहे. पोलिसांची दहा पथके, बीट मार्शल पेट्रोलिंग तसेच दोन गोपनीय पथकेही कार्यरत आहेत. मात्र, नागरिकांनी तरीही नियंमाचे उल्लंघन करताना दिसून आले आहे. नियमाचे उल्लंघन करणार्‍या दुकानदारांवर पोलीस प्रशासनाने दंडात्मक आणि दुकाने सील करण्याची कारवाई केली आहे.

हेही वाचा -'मराठा समाजाने संयम बाळगावा, ही वेळ मोर्चे काढायची नाही'

मागील दोन दिवसात विविध कलमान्वये 294 जणांवर कारवाई करत 4 लाख 13 हजार 200 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर याबरोबरच 15 मोटरसायकलीदेखील ताब्यात घेतल्या आहेत. पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

कराड शहर पोलिसांनी केलेल्या केसेसची आकडेवारी कंसात आणि दंडाची रक्कम पुढीलप्रमाणे :

  1. विनामास्क - (54) 27,000
  2. विनाकारण फिरणे - (60) 30,000
  3. खासगी प्रवासी वाहतूक - (22) 2,20,000
  4. सामाजिक अंतराचे उल्लंघटन - (47) 47,000
  5. आस्थापना सुरू ठेवणे - (25) 75,000
  6. मोटर सायकल डिटेन - (15) (जप्त)
  7. मोटर वाहन कायदा कलम - (71) 14,200

ABOUT THE AUTHOR

...view details