महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अॅसिडने भरलेला टँकर पलटी, चालक व क्लिनर थोडक्यात बचावले - सातारा

साताऱ्यात खंबाटकी घाटात बेक्र निकामी होऊन अॅसिडने भरलेला टँकर पलटी झाल्याची घटना घडली.

Breaking News

By

Published : Feb 7, 2019, 6:57 PM IST

सातारा- खंबाटकी घाटात बेक्र निकामी होऊन अॅसिडने भरलेला टँकर पलटी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातातून चालक व क्लिनर थोडक्यात बचावले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नायट्रिक अॅसिडने भरलेला टँकर (एम.एच.४३ यू. ४२६०) हा मुंबईहून उटी येथे चालला होता. खंबाटकी घाट उतरत असताना या टँकरचे बेक्र निकामी झाले. त्यामुळे चालक नियाज अहमद (वय ३३, उत्तरप्रदेश) याचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा टँकर एका वळणावर पलटी झाला. यामध्ये शाहनवाज खान (वय २२ भोपाळ) हा जखमी झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन भुईंज पोलिसांनी वाहतूक बंद करून योग्य ती खबरदरी घेतली. काही वेळानंतर वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details