वणवा लावणार्यास न्यायालयाने ठोठावली 5 हजार रूपये दंडासह १ हजार रोपे लावण्याची शिक्षा - कराड वणवा लावणार्यास न्यायालयाने ठोठावली 5 हजार रूपये दंड
सुभाष रामराव पाटील (रा. नांदगाव, ता. कराड) यांनी त्यांच्या उसाच्या फडातील पालापाचोळा पेटवला. ती आग पसरत जाऊन राखीव वनक्षेत्रात पसरला. वणव्यामुळे रोपवन व रोपवनेत्तर असे 7 हेक्टर राखीव वनक्षेत्र जळून रोपांना आगीची झळ बसली. याप्रकरणी वन गुन्हा दाखल करून चौकशी केली असता आरोपी सुभाष पाटील याने गुन्हयाची कबुली दिली होती. या खटल्यात प्रथम वर्ग न्यायाधीश एस. ए. विराणी यांनी आरोपीस दोषी धरून 5 हजार रूपये दंड ठोठावला.
कराड (सातारा) - राखीव वनक्षेत्रामध्ये वणवा लावल्याप्रकरणी आरोपी सुभाष रामराव पाटील (रा. नांदगाव, ता. कराड) यास कराड येथील प्रथम वर्ग न्यायाधीश एस. ए. विराणी यांनी 5 हजार रूपयांचा दंड ठोठावला. तसेच वनक्षेत्रातील नुकसान भरपाईप्रकरणी वेगवेगळ्या प्रजातीच्या 1 हजार रोपांची लागवड करून संगोपन करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.
वणव्यामुळे राखीव वनक्षेत्रातील रोपांना बसली झळ -सुभाष रामराव पाटील (रा. नांदगाव, ता. कराड) यांनी त्यांच्या उसाच्या फडातील पालापाचोळा पेटवला. ती आग पसरत जाऊन राखीव वनक्षेत्रात पसरला. वणव्यामुळे रोपवन व रोपवनेत्तर असे 7 हेक्टर राखीव वनक्षेत्र जळून रोपांना आगीची झळ बसली. याप्रकरणी वन गुन्हा दाखल करून चौकशी केली असता आरोपी सुभाष पाटील याने गुन्हयाची कबुली दिली होती. या खटल्यात प्रथम वर्ग न्यायाधीश एस. ए. विराणी यांनी आरोपीस दोषी धरून 5 हजार रूपये दंड ठोठावला. तसेच नुकसान भरपाई म्हणून वेगवेगळ्या प्रजातीच्या एकूण 1 हजार रोपांची लागवड आणि संगोपन करण्याचा आदेशही दिला आहे.
दीड महिन्यात खटल्याचा निकाल -वणव्याची घटना दि. 7 एप्रिल 2022 ला घडली होती. वनविभागाने आरोपीस अटक करून दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर अवघ्या दीड महिन्यात या खटल्याची सुनावणी पूर्ण करून अंतिम निकाला देण्यात आला आहे. उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनपाल बाबुराव कदम, सुनिता जाधव, वनरक्षक रमेश जाधवर, अश्विन पाटील, शंकर राठोड यांनी वन गुन्ह्याचा तपास केला.