सातारा -मायणी (ता.खटाव) येथील बेघर वृद्धेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला मायणी पोलिसांनी शनिवारी विटा येथून ताब्यात घेतले आहे. प्रभाकर यल्लाप्पा पडघम (वय 40, मुळ रा. पगडीयाला, आंध्र प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. ८ डिसेंबरच्या मध्यरात्री एका अनोळखी व्यक्तीने मायणी चौकातील एका दुकानासमोर बेघर वृद्धेवर अत्याचार केला होता. तिला मारहाण देखील करण्यात आली होती. मात्र ही वृद्धा काहीशी वेडसर असल्याने तिने याबाबत तक्रार दाखल केली नव्हती.
वृद्धेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक - Satara District Latest News
बेघर वृद्धेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला मायणी पोलिसांनी शनिवारी विटा येथून ताब्यात घेतले आहे. प्रभाकर यल्लाप्पा पडघम असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी सीसीटीव्हीत कैद
दुसऱ्या दिवशी खबऱ्याने पोलिसांना या वृद्धेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी या वृद्धेचा शोध घेतला. पोलिसांना ही महिला जखमी अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी याप्रकरणी परिसरातील दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, या महिलेवर अत्याचार झाल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली. पोलिसांनी या फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. फुटेजमध्ये आरोपीने अंगावरती निळया रंगाचा कोट घातल्याचे दिसून येत होते. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरील पोलिसांना व स्थानिक सूत्रांना आरोपीचे फोटो पाठविण्यात आले. आरोपी हा विटा भागात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. विटा भागात शोध घेऊन त्याला अखेर जेरबंद करण्यात आले.