महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात खंबाटकी बोगद्याजवळ विचित्र अपघात, आठ वाहनांचा चुराडा

पुणे-बंगळुरू महामार्गावर खंबाटकी बोगद्याजवळील एस कॉर्नरला कंटेनर पलटी झाला होता. तो कंटेनर काढत असताना भरधाव येणाऱ्या ट्रकने पुढे थांबलेल्या वाहनांना धडक दिली.

सातारा

By

Published : Nov 3, 2019, 2:54 PM IST

सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गावर खंबाटकी बोगद्याजवळील एस कॉर्नरला कंटेनर पलटी झाला होता. तो कंटेनर काढत असताना भरधाव येणाऱ्या ट्रकने पुढे थांबलेल्या वाहनांना धडक दिली. यामध्ये वाहतूक पोलीस सुनिल शेलार (वय 50) गंभीर जखमी झाले आहेत तर ८ वाहनांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - बळीराजा आमच्या जीवाभावाचा.. आम्ही सदैव त्यांच्या सोबत, त्यांनी धीर सोडू नये - उदयनराजे भोसले

महामार्गावर या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात. बोगद्यानंतर तीव्र उतार असल्याने या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. आज सकाळी सातच्या सुमारास कंटेनर (एमएच ०६ एक्यु ८९२३) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी झाला होता. हा रस्त्यात असलेला कंटेनर क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक थांबवली गेली. या ठिकाणी गर्दी झाल्याने वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस त्या ठिकाणी तैनात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने पुढे थांबलेल्या वाहनांना चिरडले. दरम्यान, मालट्रक आणि कारच्यामध्ये हवालदार सुनिल विठ्ठल शेलार हे चिरडले गेले. या अपघातात शेलार यांच्या उजवा पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर ट्रक चालकही गंभीर जखमी झाला. जखमींना खंडाळ्यात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details