महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर अपघात; १ ठार, ८ जखमी - one dead

महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर भीषण अपघात झाला. यात एक युवक ठार तर 8 जण जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त वाहने

By

Published : Jun 30, 2019, 6:31 AM IST

सातारा -महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर जीप टँकरवर आदळून झालेल्या अपघातात 1 युवक ठार तर 8 जण जखमी झाले आहेत. जखमींना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महाबळेश्वरला सहलीसाठी आलेल्या उस्मानाबाद येथील युवकाच्या जीपने (एम.एच २५, आर ९२६८) समोरून येणाऱ्या टँकरला (एम.एच ०४, बीसी ०५८९) जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती, की यात चालक अक्षय महादेव काळे जागीच ठार झाले, तर 8 जण गंभीर जखमी झाले. घटनेची नोंद पाचगणी पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे करत आहेत.

जखमींची नावे

अरबाज राहिमतुल्ला शेख (वय २१), अनिकेत भातमरेकर (२०), कृष्णा मगर (२२), वसंत ज्ञानेश्वर कदम (२१), दिगंबर गायकवाड (२२), ऋषिकेश विलास नाईक (२०), शेखर वासुदेव धंगेकर (१९), पंकज प्रल्हाद कावळे (१९) सर्वजन उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details