महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कराड-रत्नागिरी मार्गावर भीषण अपघात; १ महिला ठार, ९ जखमी - karad car accident

स्वीफ्ट कारने एस. टी. बसला समोरून धडक दिली. या अपघातात कारमधील महिला ठार, तर कारसह एसटीमधील एकूण ९ जण जखमी झाले. कराड-रत्नागिरी राज्यमार्गावर येणपे (ता. कराड) गावच्या हद्दीत सोमवारी सकाळी हा अपघात झाला.

satara car accident
कराड-रत्नागिरी मार्गावर भीषण अपघात

By

Published : Dec 9, 2019, 11:37 PM IST

सातारा- स्वीफ्ट कारने एस. टी. बसला समोरून धडक दिली. या अपघातात कारमधील महिला ठार, तर कारसह एसटीमधील एकूण ९ जण जखमी झाले. कराड-रत्नागिरी राज्यमार्गावर येणपे (ता. कराड) गावच्या हद्दीत सोमवारी सकाळी हा अपघात झाला. विजया विनायक नाईक (वय ४२, दादर, मुंबई), असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे.

मुंबईच्या दादर उपनगरातील कीर कुटुंबीय स्वीफ्ट कारने रत्नागिरीला निघाले होते. पुणे, सातारहून कराडला आल्यानंतर कराड-चांदोली मार्गे ते रत्नागिरीकडे जात होते. कराड तालुक्यातील येणपे गावच्या हद्दीत कारने कराड आगारच्या शेडगेवाडी-कराड या एस. टी. बसला समोरून भीषण धडक दिली. येणपे गावातील थांब्यावर विद्यार्थी एसटीत बसल्यानंतर एस. टी. बस काही अंतर पुढे गेली. समोरून कार भरधाव येत असल्याचे पाहून एसटी चालक संजय चव्हाण यांनी बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. परंतु, स्वीफ्ट कार चालक झोपेत असल्याने कार एसटीवर आदळून रस्त्यावरून बाजूला गेली. कारची धडक एवढी भीषण होती की, कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात कारमधील अजय दत्तात्रय कीर (वय ४३), अंजली दत्तात्रय कीर (वय ४२), सुवर्णा दत्तात्रय कीर (वय ७०), विजया विनायक नाईक (वय ४२) (चौघेही कामना सोसायटी, दादर, मुंबई) आणि कार चालक एजाज अब्दुल अजीज मकरानी (वय २९, रा. अंधेरी, पश्चिम) हे गंभीररित्या जखमी झाले. जखमींमधील विजया नाईक यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांना तातडीने कराडच्या कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात कराड-शेडगेवाडी एसटी बसमधील शाळकरी 9 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यासह कारमधील जखमींना उपचारासाठी उंडाळे ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच उंडाळे पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक दीपज्योती पाटील या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी पोलीस कर्मचारी आणि नागरीकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रूग्णालयात हलविले. तसेच कराड-रत्नागिरी राज्यमार्गावरील वाहतूकही सुरळीत केली.

ABOUT THE AUTHOR

...view details