सातारा - जिल्ह्यातील नेते, अभिनेते आणि बिगबाॅस सीझन 2चे स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी राज्यपालांच्या अखत्यारितील नियुक्तीसाठीच्या राखीव जागांमधून विधान परिषदेच्या सदस्यपदी आपली नियुक्ती व्हावी, अशी मागणी केली आहे. 2004पासून आपण सातारा, सांगली लोकसभा तसेच, 2019ची वरळी विधानसभा लढवली असल्याची माहिती त्यांनी पत्रात दिली आहे.
विधान परिषद सदस्यपदी राखीव जागेतून नियुक्ती व्हावी, अभिजीत बिचुकलेंचे राज्यपालांना पत्र - abhijeet bichukle Big boss
अभिनेते आणि बिगबाॅस सीझन 2चे स्पर्धक, अशी आपली ओळख असल्याचे अभिजीत बिचुकले यांनी पत्रात म्हटले आहे. या आधारे विधान परिषद सदस्यांत एक कलाकार म्हणून आपली नियुक्ती व्हावी, अशी मागणी त्यांनी राज्यपालंकडे केली आहे.

अभिजीत बिचुकले न्यूज
या विधान परिषद सदस्यपदाच्या मागणीमुळे पुन्हा एकदा अभिजीत बिचुकले चर्चेत आले आहेत. या आधीही त्यांनी, कोरोना काळात शाळा-काॅलेज सुरू करू नये, असे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले होते. अभिनेते, बिगबाॅस सीझन 2चे स्पर्धक अशी आपली ओळख असल्याचे अभिजीत बिचुकले यांनी पत्रात म्हटले आहे. या आधारे विधान परिषद सदस्यांत एक कलाकार म्हणून आपली नियुक्ती व्हावी, अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली आहे.