कराड(सातारा) - नियमांवर बोट ठेवत गुजरातमध्ये मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह मायभूमीत (कारवार-कर्नाटक) स्वीकारण्यात आला नाही. त्यानंतर कोल्हापुरातही एन्ट्री मिळाली नाही. परंतु, कराडमधील मुस्लीम बांधवांनी सामाजिक भान राखत त्या मृतदेहावर दफनभूमीत अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडविले आणि गुजरातपासून सुरू असलेली मृतदेहाची हेळसांड सुद्धा थांबवली.
गुजरातपासून कारवारपर्यंत मृतदेहाची हेळसांड; अखेर कराडमध्ये झाले अंत्यसंस्कार - कारवारच्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार
लॉकडाऊनच्या नियमाखाली कर्नाटक पोलिसांनी मृतदेह घेऊन आलेल्या रुग्णवाहिकेला हद्दीत येण्यास मनाई केली. त्यामुळे रुग्णवाहिका मध्यरात्री पुन्हा कोल्हापूरला आली. परंतु, कोल्हापूरमधील पोलिसांनीही प्रवेश नाकारला. कर्नाटकच्या हद्दीपासून सुरू झालेली त्या मृतदेहाची हेळसांड अखेर कराडमध्ये थांबली.
मूळचे कर्नाटकमधील कारवाचे रहिवासी असणारे असीफ सय्यद (वय 54) नोकरीनिमित्त गुजरातमध्ये स्थायिक झाले होते. रविवारी १७ मे रोजी रात्री ह्रदयविकाराने त्यांचे निधन झाले. कागदोपत्री सोपस्कर करून त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून कर्नाटकला आणण्यात आला. मात्र, लॉकडाऊनच्या नियमाखाली कर्नाटक पोलिसांनी मृतदेह घेऊन आलेल्या रुग्णवाहिकेला हद्दीत येण्यास मनाई केली. त्यामुळे रुग्णवाहिका मध्यरात्री पुन्हा कोल्हापूरला आली. परंतु, कोल्हापूरमधील पोलिसांनीही प्रवेश नाकारला. कर्नाटकच्या हद्दीपासून सुरू झालेली त्या मृतदेहाची हेळसांड अखेर कराडमध्ये थांबली. कराडमधील मुस्लीम समाजाने त्या मृतदेहावर कराडच्या इदगाह मैदानातील दफनभूमीत अंत्यसंस्कार केले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची हेळसांड थांबवत कराडच्या मुस्लीम बांधवांनी सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.