महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारमध्ये आणखी 28 रुग्णांची वाढ, तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू

बुधवारी सकाळी 52 जण कोरोनाबाधित निघाले होते. तर रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात नवे 28 कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. हे सर्व जण सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालयात संशयित म्हणून, भरती आहेत.

satara civil hospital
सातारा जिल्हा रुग्णालय

By

Published : May 28, 2020, 4:35 PM IST

सातारा - कोरोनाबाधितांचा आकडा फुगत चालला असून, बुधवारी एका दिवसात 80 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले. रात्री उशिरा आलेल्या माहितीनुसार आणखी 28 जण पाॅझिटिव्ह निघाले. जावळी तालुक्यातील एकाचा मृत्यूही झाल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या 422वर पोहचली असून मृतांची संख्या 14 झाली. याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

बुधवारी सकाळी 52 जण कोरोनाबाधित निघाले होते, तर रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात नवे 28 कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. हे सर्व जण सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालयात संशयित म्हणून, भरती आहेत. या बाधित रुग्णांमध्ये वाई ग्रामीण रुग्णालयातील 33 वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

बेलवडी (ता. जावळी) येथील 65 वर्षीय रुग्णाचा मृत्यू पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. अर्धांगवायू आणि मधुमेह असलेला हा रुग्ण 68 वर्षीय पुरुष आहे. तो 19 मे रोजी मुंबईवरून आला होता. घरात विलगीकरणात असतानाच चक्कर येऊन पडला आणि तिथेच मृत्यू झाला. त्याचा स्त्राव घेतला घेण्यात आला होता. मृत्यू पश्चात त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे डॉ. अमोद गडीकर यांनी सांगितले.

कोरोनाबाधितांची तालुकानिहाय व गावनिहाय आकडेवारी -

* वाई - जांभळी-1, आसले 2, वेरुळी 1, कोंढावळे -1, किरोंडे -1, वडवली-1, वाई ग्रामीण रुग्णालय - 1.
* महाबळेश्वर - देवळी - 2, पारुट - 3, गोरोशी - 1
* जावळी - तोरणेवाडी -1, बेलवडी-1 (मृत)
* खटाव - बनपुरी -1, वांझोळी-1, डांभेवाडी - 2,
* सातारा - वावदरे - 1
* कराड - शेणोली स्टेशन -7

ABOUT THE AUTHOR

...view details