महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा तालुक्यातील कोरोनाबाधिताचा मृत्यू, तर आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह - satara civil hospital

आत्तापर्यंत जिल्ह्यात 460 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यापैकी 143 रुग्ण बरे झाले आहेत, तर 300 रुग्णांवर उपचार सुरू असून, 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

satara covid 19
सातारा तालुक्यातील कोरोनाबाधिताचा मृत्यू

By

Published : May 29, 2020, 8:31 PM IST

सातारा - खटाव, खंडाळा आणि पाटण तालुक्यातील 8 संशयितांचे अहवाल आज कोरोनाबाधित निघाले. कारी (ता. सातारा) येथील 54 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा आज मृत्यू झाला आहे. उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 300, तर कोरोनाचा बळी ठरलेल्यांची संख्या 17 झाली आहे. ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणारे चिंचणी (ता. खटाव) येथील 5, पळशी (ता. खंडाळा) येथील 1, नवसरवाडी (ता.पाटण) येथील 1 व ताम्हीणे येथील 1 असे एकूण 8 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

86 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह -

जिल्ह्यातील 86 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय 24, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 26, ग्रामीण रुग्णालय वाई 93, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 42, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव 30 व शिरवळ 42 असे एकूण 257 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती असेही डॉ. गडीकर यांनी सांगितले. आत्तापर्यंत जिल्ह्यात 460 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यापैकी 143 रुग्ण बरे झाले आहेत. तर 300 रुग्णांवर उपचार सुरू असून, 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details