महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शालेय मुलीवर अत्याचार करणारा संशयित म्हसवड पोलिसांच्या ताब्यात - सातारा पोलिस

म्हसवड येथे १० वर्षीय मुलीवर अज्ञाताने पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबतीत म्हसवड पोलिसांनी माहितीगारांच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

संशयीत आरोपीचे रेखाचित्र

By

Published : Jul 3, 2019, 10:43 PM IST

सातारा- म्हसवड येथे १० वर्षीय मुलीवर अज्ञाताने पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कारानंतर आरोपीने पीडितेला आणि तिच्या लहान भावंडाना या प्रकरणाची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. याबाबतीत म्हसवड पोलिसांनी माहितीगारांच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

संशयीत आरोपीचे रेखाचित्र


म्हसवड येथे काल शाळा सुटल्यानंतर १० वर्षीय मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने अज्ञाताने आपल्या दुचाकीवर बसविले होते. त्यानंतर मुलीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार केला होता. नंतर आरोपीने पीडितेला आणि तिच्या लहान भावंडांना या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला होता. हा सर्व प्रकार सातारा पोलिसांना माहिती झाल्यावर त्यांनी मुलीला याबद्दल विचारणा केली व तीने दिलेल्या वर्णनानुसार आरोपीचे रेखाचित्र तयार केले होते.


सातारा पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्र तयार करुन म्हसवड पोलिसांकडे दिले होते. त्यानंतर म्हसवड पोलिसांनी ते रेखाचित्र काही माहितगारांकडे दिले व ते सोशल मीडियावरही प्रसिद्ध झाले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांना विरकरवाडी येथे एक तरुण संशयीतरित्या फिरताना आढळून आल्याने स.पो.नि. देशमुख यांनी त्याला तत्काळ ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. पाडितेच्या लहान बहिणीला संशयिताच्या समोर उभे केले असता त्या चिमुरडीने आपल्याला यानेच गाडीवर बसवून नेले असून त्यानेच दमबाजी केली असल्याचे पोलिसांना सांगितले. यावरुन पोलिसांनी त्याला त्वरित अटक करुन वैद्यकीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. उद्या त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


या खळबळजनक घटनेमुळे म्हसवडचे नागरिक संतापले असून त्यांनी या घटनेच्या निषेधार्त उद्या म्हसवड बंद ची हाक दिली आहे. संपूर्ण शहरवासियांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details