कराड (सातारा)- पेट्रोलिंग करत असताना एका पोलिसाला रस्त्यात आजीबाई भेटल्या. कुठे चाललाय म्हणून विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, घरात आठ दिवसापासून गोडेतेल नाही. त्या पोलिसाने त्यांना दुसऱ्या दिवशी विजय दिवस चौकात बोलावून गोडेतेलाची पिशवी दिली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि खाकीतील माणुसकीचे दर्शनही घडले.
कोरोनाच्या पार्श्वभूमी सर्वत्र टाळेबंदी सुरू आहे. या काळा रोजंदारी कामगार, गरिबांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत झाली आहे. अनेकांच्या घरातील किराणा सामान संपत आहे. अशात कराडमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा पन्नाशी पार गेल्याने कराड, मलकापूरसह आसपासची गावे पुर्णपणे बंद आहेत.
संचारबंदीच्या काळात बंदोबस्तावेळी शिवाजी हौसिंग सोसायटी परिसरात पेट्रोलिंग करताना कराड शहर पोलीस ठाण्यातील हवालदार मारुती चव्हाण यांना रस्त्यावर एक आजी दिसल्या. त्यांनी त्यांच्याकडे जाऊन संचारबंदीच्या काळात बाहेर का फिरत आहात, अशी विचारणा केली. त्यानंतर घरातील गोडेतेल आठ दिवसापासून संपलेले आहे आणि पैसेही संपलेले आहे, त्यामुळे घराबाहेर पडल्याचे आजीने सांगितले. पण, दुपारच्यावेळी सर्व दुकाने बंद असल्याने त्यांनी त्या आजी दुसऱ्या दिवशी विजय दिवस चौकातील पोलीस चौकीजवळ यायला सांगितले.
हवालदार चव्हाणांकडेही नव्हते पैसे