महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत; कोरेगाव तालुक्यातील घटना - child abuse case satara

गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास संबधित मुलगी आपल्या आजीकडे जात होती. दरम्यान, आरोपीने तिच्याशी गोड बोलून तिला घरात बोलवले व तिच्यावर अत्याचार केला. या घटनेत ही अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिली असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वाठार पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By

Published : Jul 13, 2020, 8:01 PM IST

सातारा : जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील सोनके गावातील एकाला वाठार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हिंदुराव मारुती धुमाळ असे आरोपीचे नाव आहे. पिडीत मुलगी तब्बल चार महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर ही माणुसकीला काळिमा फासणारी अमानुष घटना उघडकीस आली असून याबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास संबधित मुलगी आपल्या आजीकडे जात होती. दरम्यान, आरोपीने तिच्याशी गोड बोलून तिला घरात बोलवले व तिच्यावर अत्याचार केला. या घटनेत ही अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिली असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर या घटनेला वाचा फुटली. याबाबत मुलीच्या आईने शनिवारी ११ जुलैरोजी वाठार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी सदर आरोपीवर भादविस कलम ३७६(३), (२) पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील हे पुढील तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details