सातारा साताऱ्यात एका तरूणाने जादुटोणा करुन तरूणीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे A girl raped by doing witchcraft. याप्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल करून मुक्तार नासीर शेख याला ताब्यात घेतले आहे.
डोक्यावर लिंबू फिरवल्याने आली भोवळसंशयिताने तरूणीला रुममध्ये नेऊन तिच्या डोक्यावर लिंबू फिरवला. त्यामुळे तिला भोवळ आली. त्यानंतर त्याने जबरदस्तीने अत्याचार केल्याचे तरूणीने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी साताऱ्यातील शाहुपुरी पोलिसांनी मुक्तार शेख याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय कायअंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धेविरोधात विवेकाचा आवाज बुलंद केला. सातारा जिल्ह्यात प्रबोधनाची चळवळ राबवली. त्याच साताऱ्यात जादूटोणा करून अत्याचाराचा प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सरकार कठोरपणे कायद्याची अंमलबजावणी करणार आहे का, असा सवाल अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे.
हेही वाचा APMC market पालक, मेथी, कोथिंबीर, मिरची, वांगी, वाल, वाटाणा घेवडा फ्लॉवर फरसबीचे दर वाढले, इतर भाज्यांचे दर स्थिर