कराड (सातारा) - शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून एक शेतकरी जागीच ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना कराड तालुक्यातील शिरगावात घडली. रूपेश हणमंत यादव (वय 38) असे मृत शेतकर्याचे नाव असून दादासाहेब थोरात हे जखमी आहेत.
अंगावर वीज पडून शेतकरी जागीच ठार, दुसरा गंभीर जखमी - satara rain news
शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून एक शेतकरी जागीच ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना कराड तालुक्यातील शिरगावात घडली.
![अंगावर वीज पडून शेतकरी जागीच ठार, दुसरा गंभीर जखमी farmere death](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-03:03:38:1619602418-mh-str-1-afarmerwaskilledonthespotandanotherseriouslyinjured-10054-28042021144123-2804f-1619601083-522.jpg)
कराड तालुक्यात मंगळवारी दुपारी विजांच्या कडकडाटात वादळी वार्यासह जोरदार वळीव पाऊस झाला. दुपारी चारच्या सुमारास शिरगाव परिसरातही वादळी वारे आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी दादासाहेब थोरात आणि रूपेश यादव हे ऊस फोडणीचे काम करत होते. विजांचा कडकडाट आणि पाऊस सुरू होताच ते काम थांबवून शेतात बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच वीजेचा लोळ रूपेश यादव यांच्या अंगावर पडला. त्यात ते जागीच ठार झाले, तर दादासाहेब थोरात हे गंभीर जखमी झाले.
वीज पडताना मोठा आवाज झाल्यामुळे शेतातील आजुबाजूच्या लोकांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने दोघांना उपचारासाठी उंब्रजच्या रूग्णालयात आणले. परंतु, रूपेश यादव यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमी असलेल्या दादासाहेब थोरात यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. वीज पडून सहकार्याचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेने त्यांना धक्का बसला आहे.