कराड (सातारा) - ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरखाली सापडल्याने शेतकर्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वाघेरी (ता. कराड) येथे घडली. वाघेरी गावातील हलग्या नावाच्या शिवारात रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दादा अब्दुल पटेल (वय 55, रा. वाघेरी, ता. कराड) असे मृत्यू झालेल्या शेतकर्याचे नाव आहे.
ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरखाली सापडल्याने शेतकर्याचा जागीच मृत्यू, कराडमधील वाघेरी येथील घटना - Karad Satara News
ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरखाली सापडल्याने शेतकर्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वाघेरी (ता. कराड) येथे घडली. वाघेरी गावातील हलग्या नावाच्या शिवारात रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दादा अब्दुल पटेल (वय 55, रा. वाघेरी, ता. कराड) असे मृत्यू झालेल्या शेतकर्याचे नाव आहे.
तोल जाऊन रोटाव्हेटरखाली पडले...
वाघेरी येथे पटेल कुटुबीयांची हलग्या नावाच्या शिवारात शेतजमीन आहे. त्या क्षेत्रातील उसाची तोड झाली असून पाचट जाळल्यानंतर रविवारी शेतामध्ये रोटर मारण्याचे काम सुरू होते. दादा पटेल यांचा पुतण्या ट्रॅक्टर चालवित होता. रोटरर जमिनीला घासून जात नसल्यामुळे दादा पटेल हे रोटावेटरवर उभे राहिले. मात्र, अचानक तोल जाऊन ते ट्रॅक्टरखाली रोटाव्हेटरसमोर पडले. त्यामुळे त्यांच्या अंगावरून रोटाव्हेटर जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली.
हेही वाचा - धडाकेबाज कामगिरी : तहानलेल्या बिबट्याच्या बछड्यांना पाजले पाणी, पाहा व्हिडिओ