कराड (सातारा) - कोयना धरणाच्या भिंतीवर आज सकाळी सात फूट लांबीचा अजगर आढळला. सर्पमित्रांनी अजगराला पकडून जंगलात सोडून दिले. धरणातील पाण्याची पातळी पाहण्यासाठी गेलेल्या कर्मचार्यास हा अजगर दिसला होता. भिंतीवरून खाली उतरून या अजगरास सर्पमित्रांनी पकडले.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या भिंतीच्या मधोमध सात फुटाचा अजगर कर्मचार्याच्या नजरेस पडला. ही जागा अत्यंत अडचणीची होती. त्यामुळे कर्मचार्याने कोयना विभागातील सर्पमित्र विकास माने, विश्वजित जाधव यांना बोलावले. त्यांनी भिंतीवरून खाली उतरत अजगरास सुरक्षितरित्या धरणाच्या पुलावर आणले. त्यानंतर अजगरास जंगलात सोडून देण्यात आले. धरणातील पाण्याची पातळी पाहण्यासाठी कोयना धरणाचा कर्मचारी गेला होता. त्यावेळी त्याला हा अजगर दिसला.