महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे 972 नवे रुग्ण ; बाधितांचा दर 9.22 टक्के - satara corona death

मंगळवारी 10 हजार 538 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 972 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले. आलेल्या बाधितांमधे सातारा व कराड तालुक्यातील सर्वाधिक अनुक्रमे 224 व  154 रुग्ण आढळले आहेत.आज अखेर एकूण 1 लाख 82 हजार 928 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे 972 नवे रुग्ण
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे 972 नवे रुग्ण

By

Published : Jun 17, 2021, 3:20 AM IST

सातारा- कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात बाधित रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 972 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. मंगळवारचा पाॅझिटीव्हिटी रेट 9.22 टक्के इतका आहे.यामध्ये सातारा व कराड तालुक्यामध्ये सर्वाधिक बाधित आढळून आले आहेत.

सातारा व कराडमध्ये अधिक बाधित

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे 972 नवे रुग्ण
या बाबतची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठवले यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी 10 हजार 538 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 972 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले. आलेल्या बाधितांमधे सातारा व कराड तालुक्यातील सर्वाधिक अनुक्रमे 224 व 154 रुग्ण आढळले आहेत. तर जावळीत 40, खंडाळा 67, खटाव 139, कोरेगाव 98, माण 53, महाबळेश्वर 15, पाटण 42, फलटण 80, वाई 46 व इतर 14 असे बाधित तालुकानिहाय आढळून आले आहेत. आज अखेर एकूण 1 लाख 82 हजार 928 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. 26 रुग्ण दगावले आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये कराड 7, कोरेगाव 3, खटाव 2, सातारा 7, माण 2, पाटण 2, फलटण 1, वाई 2 यांचा समावेश आहे. आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4 हजार 120 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 8 हजार 504 रुग्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.

980 नागरिकांना डिस्चार्ज
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसी मध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 980 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. आज अखेर 1 लाख 70 हजार 576 नागरक या आजारातून बरे झाले आहेत.

हेही वाचा- यवतमाळसाठी धोक्याची घंटा; पुन्हा 8 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर एकूण रुग्णांची संख्या 14वर

ABOUT THE AUTHOR

...view details