महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात ९३ टक्के शाळा सुरू, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतही वाढ - Satara district latest news

जिल्ह्यातील ९ वी ते १२वीच्या १ लाख ५७ हजार ६०१ विद्यार्थ्यांच्या पालकांपैकी ६८ हजार ९०७ पालकांनी संमतीपत्रे दिली आहेत. सध्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत २० टक्के वाढ होवून २५.५६ टक्के इतके विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. सत्रपद्धती आणि दिवसाआड पद्धती लक्षात घेता प्रत्यक्षात ४० टक्केहून अधिक विद्यार्थी उपस्थित रहात आहेत.

93% schools open in Satara district
सातारा जिल्ह्यात ९३ टक्के शाळा सुरू, उपस्थितीतही वाढ

By

Published : Dec 13, 2020, 6:47 AM IST

सातारा - सातारा जिल्ह्यातील इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग असलेल्या ८१९ शाळांपैकी ७१३ शाळा सुरू झाल्या होत्या. आता यात वाढ होवून सध्या ७५९ शाळा (९२.६७ टक्के) शाळा सुरू झाल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिली. आतापर्यंत ४४ टक्के पालकांची संमतीपत्रे प्राप्त झाली असून संमतीपत्रे प्राप्त होण्याची गती संथ असल्याचेही त्यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केले.

सातारा जिल्ह्यात ९३ टक्के शाळा सुरू

विद्यार्थ्यांची हजेरी ४० टक्के -

जिल्ह्यातील ९ वी ते १२वीच्या १ लाख ५७ हजार ६०१ विद्यार्थ्यांच्या पालकांपैकी ६८ हजार ९०७ पालकांनी संमतीपत्रे दिली आहेत. सध्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत २० टक्के वाढ होवून २५.५६ टक्के इतके विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. सत्रपद्धती आणि दिवसाआड पद्धती लक्षात घेता प्रत्यक्षात ४० टक्केहून अधिक विद्यार्थी उपस्थित रहात आहेत.

१०६ कोरोना बाधित कर्मचारी -

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इ.९ वी ते इ.१२ वी चे शिक्षक व शिक्षकेतर यांची कोवीड चाचणी करण्याच्या सुचना आरोग्य विभागाला दिल्या. सध्या जिल्हयात ७० शिक्षक व ३६ शिक्षकेतर असे एकूण १०६ कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी आहेत, असे उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे यांनी सांगितले.

फलटण - पाटण मध्ये १०० टक्के शाळा सुरू -

फलटण व पाटण तालुक्यातील १०० टक्के शाळा सुरू झाल्या असून महाबळेश्वर येथील ६० टक्के शाळा सुरू आहेत. उर्वरित तालुक्यात सुरू असलेल्या शाळांची संख्या ९० टक्के आहे. बंद असलेल्या शाळांपैकी काही शाळा पुढील आठवडयात सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच उर्वरित सर्व शाळा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू होतील, असा शिक्षणविभागाचा अंदाज आहे. अद्याप सुरू न झालेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांची ऑनलाईन बैठक शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर यांनी घेतली. बैठकीत कोविडचे सर्व नियम पाळून व आवश्यक काळजी घेवून शाळा सुरू कराव्यात. तसेच विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत आवश्यकतेनुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका घेणार असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -योगराज सिंग पुन्हा चर्चेत...दिग्दर्शकाने केली चित्रपटातून हकालपट्टी

४४ टक्के पालकांची संमतीपत्रे -

आतापर्यंत ४४ टक्के पालकांचे संमतीपत्र प्राप्त झाले आहे. संमतीपत्रे प्राप्त होण्याची गती संथ आहे. महत्वाच्या विषयाचा अध्यापनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून संमतीपत्र आवश्यक आहे. त्यामुळे पालकांचे समुपदेशन करुन कोविडची भीती कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने शाळांना सुचना दिल्या आहेत, असे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थी उपस्थिती वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने एस.टी.च्या विभाग नियंत्रकाशी पत्रव्यवहार केला आहे. मास्कचा वापर, हातांची स्वच्छता आणि सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचे पालन करुन शाळा सुरू आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तालुकानिहाय सुरू असलेल्या व सुरू न झालेल्या शाळा व एकूण शाळांची संख्या पुढील प्रमाणे -

सातारा-(१२१), (१२),१३३
कराड-(१४१),(०५),१४६
कोरेगांव-(६०), (०६),६६
पाटण-(६९), (००),६९
जावळी-(३१), (०५)३६
महाबळेश्वर-(३१), (२१),५२
वाई-(५५), (०२),५७
खंडाळा-(३३),(०२),३५
फलटण-(८०), (००),८०
माण-(६९), (०३),७२
खटाव-(६९),(०४),७३
जिल्हा एकूण-(७५९),(६०),८१९

शासन निर्णयानुसार व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिकचे इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. राज्यात ९० टक्के पेक्षा जास्त शाळा सुरू असलेले जिल्हे मोजकेच असून त्यात साताऱ्याचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details