महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Flood And Land Sliding At Satara: साताऱ्यातील ८१ गावांना यंदाही पूर, दरड आणि भूस्खलनाचा धोका

मागील वर्षी जुलै महिन्यात भूस्खलन होऊन पाटण तालुक्यात १८ जणांचा बळी गेला होता. तसेच मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. यंदाच्या पावसाळ्यात देखील पाटण तालुक्याला भूस्खलनासोबत पूर आणि दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका आहे.

Flood And Land Sliding At Satara
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jun 11, 2022, 7:40 PM IST

सातारा -पाटणमधील ८१ गावे, वाड्या वस्त्या या संभाव्य पूर, दरड आणि भूस्खलनग्रस्त म्हणून प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडून ग्रामस्थांना भूगर्भ तज्ज्ञांमार्फत दरड साक्षरतेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मागील वर्षी पाटण तालुक्यात 18 जणांना आपला जीव गमवावा लागल्यामुळे प्रशासनाने याबाबतची तयारी सुरू केली आहे.

१८ जणांचा बळी होता गेला -मागील वर्षी जुलै महिन्यात भूस्खलन होऊन पाटण तालुक्यात १८ जणांचा बळी गेला होता. तसेच मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. यंदाच्या पावसाळ्यात देखील पाटण तालुक्याला भूस्खलनासोबत पूर आणि दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका आहे. पाटणमधील ८१ गावे, वाड्या वस्त्या या संभाव्य पूर, दरड आणि भूस्खलनग्रस्त म्हणून प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडून ग्रामस्थ, प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही भूगर्भ तज्ज्ञांमार्फत दरड साक्षरतेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

संग्रहित छायाचित्र

४२ गावांना भूस्खलनाचा तर २७ गावांना पुराचा धोका - अतिवृष्टीमध्ये दरडी, डोंगराचे कडे कोसळतात. मागील वर्षाप्रमाणे यंदाही अतिवृष्टी झाल्यास भूस्खलनाचा धोका आहे. या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या सर्व्हेक्षणात तब्बल ४२ गावांना भूस्खलन होण्याचा संभाव्य धोका असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय नदीकाठच्या २७ गावांना पुराचाही फटका बसू शकतो, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

दरड, डोंगरकडा कोसळण्याचा १२ गावांना धोका - पाटण तालुका मुसळधार पावसाचे क्षेत्र समजले जातो. तसेच डोंगर आणि दर्‍याखोर्‍यांचा तालुका म्हणूनही पाटण तालुक्याची ओळख आहे. अनेक गावे, वाड्या-वस्त्या डोंगराकडेला वसलेल्या आहेत. अतिवृष्टी झाल्यास दरड तसेच डोंगराचे कडे कोसळण्याचा धोका संभवतो. मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता यंदा १२ गावांना दरड आणि डोंगरकडे कोसळण्याचा संभाव्य धोका आहे.

भूगर्भ तज्ज्ञांमार्फत नागरिक, प्रशासकीय अधिकार्‍यांना प्रशिक्षण - जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार दरड प्रवण भागातील नागरिकांसह गाव स्तरावरील प्रशासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना भूगर्भ तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देऊन दरड साक्षरता मोहीम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवर निरक्षणाद्वारे संभाव्य धोके ओळखता येतील आणि दरडीमुळे होणारी हानी टाळणे शक्य होईल, अशी माहिती पाटणचे तहसीलदार रमेश पाटील यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details