सातारा(कराड) - तालुक्यातील ८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये कराड उपजिल्हा रुग्णालयातील पाच परिचारिका, एक कर्मचारी, खासगी रुग्णालयात प्रसुती झालेली महिला आणि मलकापूर- शिवनगरमधील एका पुरूषाचा समावेश आहे. यामुळे कराड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४१ आणि सातारा जिल्ह्यातील संख्या ५२ झाली आहे.
कराड उपजिल्हा रुग्णालयातील पाच परिचारिका अन् एका कर्मचाऱ्यासह आठ जण कोरोना पॉझिटिव्ह
उपजिल्हा रुग्णालयातील बहुतांश कर्मचारी कराडमध्येच वास्तव्याला आहेत. कराड उपजिल्हा रुग्णालयातील पाच परिचारिका, एका कर्मचाऱ्यासह कोरोनाचे आठ नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे कराड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४१ आणि सातारा जिल्ह्यातील संख्या ५२ झाली आहे.
कराड उपजिल्हा रुग्णालय
उपजिल्हा रुग्णालयातील बहुतांश कर्मचारी कराडमध्येच वास्तव्याला आहेत. या कोरोनाबाधितांमधील एक महिला सातारा तालुक्यातून आणि एक फार्मासिस्ट महिला कर्मचारी येथून नोकरीसाठी उपजिल्हा रुग्णालयात येते.
उंब्रजमधून येणारी फार्मासिस्ट तरुणी रुग्णांच्या सहवासात होती. त्यामुळे तिची तपासणी करण्यात आली. तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिला आरोग्य यंत्रणेने उपचारासाठी ताब्यात घेतले. तसेच उंब्रजसह आसपासचा परिसर पूर्णत: सील करण्यात आला आहे.