महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात उत्पादन शुल्कच्या पथकाची कारवाई; 8 लाख 34 हजाराचा मुद्देमाल जप्त - अनिल चासकर

निवडणूक आचारसंहितेच्या काळात अवैध मद्यविक्रीवर प्रतिबंध आणण्यासह मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी मद्याचा वापर होऊ नये, म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चोरट्या मद्य वाहतूक आणि विक्रीवर कारवाईची मोहीम राबविली जात आहे.

साताऱ्यात उत्पादन शुल्कच्या पथकाकडून 8 लाख 34 हजाराचा मुद्देमाल जप्त

By

Published : Oct 10, 2019, 9:49 PM IST

सातारा- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कराड येथील पथकाने 86 लिटर देशी दारुच्या बाटल्यांचे बॉक्स आणि चारचाकी वाहन जप्त केले आहे. हा एकूण 8 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा-मुख्यमंत्री हे मैदानातून पळ काढलेले पैलवान - विजय वडेट्टीवार

निवडणूक आचारसंहितेच्या काळात अवैध मद्यविक्रीवर प्रतिबंध आणण्यासह मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी मद्याचा वापर होऊ नये, म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चोरट्या मद्य वाहतूक आणि विक्रीवर कारवाईची मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत गुरुवारी उत्पादन शुल्कच्या कराड पथकाने कराड-शिराळा या मार्गावरुन निघालेल्या संशयित चारचाकी वाहनाला अडवून तपासणी केली. त्यामध्ये देशी दारुच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले. या कारवाईत सुमारे 86 लिटर मद्यासह चारचाकी वाहन मिळून 8 लाख 34 हजाराचा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. तसेच एकावर मुंबई दारुबंदी कायद्यान्वये कारवाई करुन अटक केली आहे.

उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अधीक्षक अनिल चासकर यांच्या सूचनेनुसार कराड विभागाचे निरीक्षक आर. एस. पाटील, दुय्यम निरीक्षक एस. बी. जंगम, पी. ए. बोडेकर, आर. एस. माने, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. टी. बावकर, जवान पी. आर. गायकवाड, व्ही. व्ही. बनसोडे, एस. आर. बक्केवाड, जे. एस. माने यांनी ही कारवाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details