सातारा षण्मुखानंद ललित कला आणि संगीत सभेतर्फे साताऱ्यातील मिलिटरी अपशिंगे या लष्करी पार्श्वभूमी असलेल्या गावातील 75 युद्धवीरांचा स्वातंत्र्यदिनी Indian Independence Day गौरव करण्यात येणार 75 military veterans will be honored आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गौरवआझादी का अमृत महोत्सव या सोहळ्याचा एक भाग म्हणून मिलिटरी अपशिंगे गावातील 75 युद्धवीरांचा सन्मान केला जाणार आहे. षण्मुखानंद ललित कला आणि संगीत सभेतर्फे 15 ऑगस्ट रोजी लष्कराचे जनरल ऑफिसर कमांडिंग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा गौरव होणार असल्याचे गोवा विभागाचे लेफ्टनंट जनरल एच एस कोहली यांनी म्हटले आहे.
देशातील एकमेव लष्करी गावसातारा जिल्ह्यातील मिलिटरी अपशिंगे या ३ हजार लोकसंख्येच्या गावात ३५० कुटुंबे आहेत. येथे प्रत्येक कुटुंबातील एक सदस्य लष्करात किंवा सहयोगी दलात कार्यरत आहे. देशातील हे एकमेव लष्करी गाव आहे आत्तापर्यंत 1650 हून अधिक ग्रामस्थांनी भारतीय सैन्यात सेवा केली आहे.
पहिल्या महायुद्धात 46 जवान हुतात्माकुटुंबातील किमान एक सदस्य सशस्त्र दलात सेवा करत असल्यामुळे अपशिंगे मिलिटरी गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. पहिल्या महायुद्धात ब्रिटनसाठी लढताना या गावातील 46 जवानांना हौतात्म्य आले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गावात स्मारक उभारून ब्रिटिश सरकारने या गावाच्या योगदानाची दखल घेतली होती.
अपशिंगेतील जवानांचा सर्व युद्धांमध्ये भागअपशिंगे मिलिटरी गावातील सैनिकांनी भारताने लढलेल्या सर्व युद्धांमध्ये भाग घेतला आहे 1962 च्या चीन विरुद्धच्या युद्धात 4 सैनिक 1965 च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात 2 सैनिक आणि 1971 च्या युद्धात 1 सैनिक गमावला आहे कारगिल युद्धात देखील अपशिंगे गावातील सैनिक प्राणाची बाजी लावून लढले आहेत.
भारतीय सैन्य दलाकडून रणगाड्याची भेट सैनिकी परंपरा जपत देश रक्षणासाठी योगदान देणाऱ्या मिलिटरी अपशिंगे या सैनिकांच्या गावाला भारतीय सैन्य दलाकडून रशियन बनावटीचा रणगाडा भेट देण्यात आला. लष्करी परंपरेच्या स्मृती जपण्यासाठी हा रणगाडा देण्यात आला असून रणगाडा दिले गेलेले मिलिटरी अपशिंगे हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे. यामुळे या गावाच्या लौकीकात भर पडली आहे.
हेही वाचाIndian Independence Day आकर्षक रोषणाई मुळे वाढले बिबीच्या मकबऱ्याचे सौंदर्य