महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कराडच्या 'त्या' 70 वर्षीय महिलेचा मृत्यू कोरोनामुळे नाही; 36 संभाव्य व्यक्तींचे रिपोर्टही निगेटिव्ह

सोमवारी सातारच्या कृष्णा रुग्णालयात दाखल असलेल्या ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर आलेल्या अहवालात त्यांना कोरोनाची बाधा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 12,कराडच्या कृष्णा रुग्णालयामधील 22, उपजिल्हा रुग्णालय, कराड व फलटण येथील प्रत्येकी 1 असे एकूण 36 संभाव्य व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

कराडच्या 'त्या' 70 वर्षीय महिलेचा मृत्यु कोरोनामुळे नाही
कराडच्या 'त्या' 70 वर्षीय महिलेचा मृत्यु कोरोनामुळे नाही

By

Published : Apr 21, 2020, 1:30 PM IST

सातारा - कराडच्या कृष्णा रुग्णालयामध्ये काल (सोमवारी) मृत्यू झालेल्या 70 वर्षीय आजींना कोरोनाची बाधा नव्हती, असे आज(मंगळवार) मिळालेल्या वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर 36 संभाव्य व्यक्तींचे अहवालही निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

कराडच्या 'त्या' 70 वर्षीय महिलेचा मृत्यु कोरोनामुळे नाही

सोमवारी सातारच्या कृष्णा रुग्णालयात दाखल असलेल्या ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर आलेल्या अहवालात त्यांना कोरोनाची बाधा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 12,कराडच्या कृष्णा रुग्णालयामधील 22, उपजिल्हा रुग्णालय, कराड व फलटण येथील प्रत्येकी 1 असे एकूण 36 संभाव्य व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

सोमवारी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 3 नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. येथे दाखल असणाऱ्या बाधित रुग्णांचा 14 दिवसानंतरचा एक अहवाल पॉझिटिव्ह व दुसरा अहवाल Inconclusive असल्याचे बीजे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. त्यामुळे या रुग्णांवर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आणखी पाच दिवस उपचार व पुर्नतपासणी करुन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. गडीकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details