कराड (सातारा) - जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आढळून आलेल्या कोरोनाबाधित रूग्णांवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यापैकी सात जण आज (शुक्रवारी) कोरोनामुक्त झाले. यात शिरवळ पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याचाही कोरोनामुक्त रूग्णांमध्ये समावेश आहे. कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधील 177 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
दिलासादायक...! साताऱ्यात ७ रुग्ण कोरोनामुक्त; एका पोलिसाचाही समावेश - karad corona latest news
पाटण तालुक्यातील नवसरी येथील 60 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला, नवसरवाडी येथील 22 आणि 25 वर्षीय तरूण, ताम्हिणे येथील 25 वर्षीय तरूण, कालेवाडी येथील 21 वर्षीय तरूण आणि शिरवळ पोलीस स्टेशनमधील 30 वर्षीय कर्मचारी, अशा सात जणांवर कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना वार्डमध्ये उपचार सुरू होते.
पाटण तालुक्यातील नवसरी येथील 60 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला, नवसरवाडी येथील 22 आणि 25 वर्षीय तरूण, ताम्हिणे येथील 25 वर्षीय तरूण, कालेवाडी येथील 21 वर्षीय तरूण आणि शिरवळ पोलीस स्टेशनमधील 30 वर्षीय कर्मचारी, अशा सात जणांवर कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना वार्डमध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज (शुक्रवारी) त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.
यावेळी शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, राजू देशमुख, डॉ. सुजाता कानेटकर, डॉ. व्ही. सी. पाटील यांच्या हस्ते कोरोनामुक्त रूग्णांचा पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तर कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील, रोहिणी बाबर आदी हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.