सातारा :राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. सातारा जिल्ह्यात शनिवारी 688 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. सध्या जिल्ह्यात 4 हजार 538 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत 60 हजार 990 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर 1 हजार 890 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 67 हजार 427 वर पोहोचली आहे. दरम्यान, कोविड संसर्ग उपाय योजनांसाठी कडक भूमिका प्रशासनाने घ्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांसह मान्यवरांनी दिल्या आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.
..तर खासगी डाॅक्टरांवर गुन्हे
सातारा जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनारुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील खासगी डॉक्टर मात्र लक्षणं असूनही इतर उपचार करतात. पर्यायाने रुग्णांमध्ये कोरोना संसर्ग होण्याचा धोका वाढत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रोटोकॉल प्रमाणे खासगी डॉक्टरांनी कोविड उपचार करावेत. तसे न केल्यास जिल्हा प्रशासनाकडून अशा खासगी डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.
गृहराज्यमंत्र्यांच्या पोलीस विभागाला सूचना