सातारा -जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 623 नागरिकांचे अहवाल पॅाझिटिव्ह आले असून 17 बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर, 2 हजार 64 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठवले यांनी दिली आहे.
साता-यात सर्वाधिक रुग्ण
रविवारी आढळलेल्या बाधितांमध्ये सातारा तालुक्यात सर्वाधिक 164 रुग्ण आढळले. तर, जावळीत 25, कराड 93, खंडाळा 21, खटाव 122, कोरेगाव 47, माण 33, महाबळेश्वर 9, पाटण 47, फलटण 36, वाई 20 व इतर 6 असे तालुकानिहाय बाधीत आढळून आले. आजपर्यंत एकूण 1 लाख 81 हजार 161 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. सोमवारी 5 हजार 592 जणांचे नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 623 जणांचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे.
9 हजार 267 रुग्ण ऍक्टिव्ह
सोमवारी मृत्यू झालेल्यांमध्ये जावली 1, कराड 4, खंडाळा 1, खटाव 6, सातारा 1, माण 2, फलटण 1, वाई 1 येथील रुणांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 4 हजार 65 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्यस्थितीत 9 हजार 267 रुग्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.
2 हजार 64 नागरिकांना डिस्चार्ज
सोमवारी संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 2 हजार 64 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यातील एकूण कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 68 हजार 9 वर पोहोचली आहे.
हेही वाचा - आजपर्यंत सर्वच राज्यकर्त्यांनी नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले - अजित पवार