सातारा - जिल्ह्यात कोरोना बाधितांची साथ आटोक्यात येईल असे वाटत असताना, काल (गुरुवारी) कराड तालुक्यात एक बाधीत आढळल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. गेल्या २४ तासात कराडच्या कृष्णा हाॅस्पीटलमध्ये बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले 40 पुरुष व 15 महिलांना कोरोना संभाव्य म्हणून दाखल करण्यात आले आहे.
कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील 55 जण कराडच्या 'कृष्णा'मध्ये दाखल
जिल्हा रुग्णालयात दाखल असणारे 6 आणि कृष्णा हॉस्पिटल आणि खासगी रुग्णालयातील प्रत्येकी एक अशा 8 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या सर्वांचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच त्यांना बाधा झाली आहे कि नाही हे स्पष्ट होईल, असे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.
बुधवारी कोरोना संभाव्य म्हणून, कृष्णा हाॅस्पिटलमध्ये दाखल झालेल्या ३५ वर्षीय तरूण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल मिळाला. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने संबंधित गावाच्या सीमा पुर्ण बंद करत त्या तरूणाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला. असे 40 पुरुष व 15 महिलांना कृष्णा हाॅस्पिटलमध्ये कोरोना संभाव्य रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले आहे. शिवाय जर्मन-मस्कत-दिल्ली असा प्रवास करून आलेला 31 वर्षीय पुरुष तसेच दिल्ली येथून प्रवास करून आलेला 18 वर्षीय युवक आणि 45 वर्षीय पुरुष, अशा एकूण 3 जणांना जिल्हा रुग्णालयातील विलीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयात दाखल असणारे 6 आणि कृष्णा हॉस्पिटल आणि खासगी रुग्णालयातील प्रत्येकी एक अशा 8 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या सर्वांचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच त्यांना बाधा झाली आहे कि नाही हे स्पष्ट होईल, असे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.
पुणे-मुंबई आणि परदेशातून सातारा जिल्ह्यात गावी आलेल्या व्यक्तींनी इतरत्र फिरत न बसत घरातच रहावे व सामाजिक अंतर पाळावे. यामधील कोणाला ताप, खोकला, शिंक किंवा श्वसनाचा त्रास उद्भवल्यास शासकीय वैद्यकीय यंत्रणेला कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
कोरोना संभाव्य आणि रुग्णांचा तपशील -
1. एकूण दाखल - 166
2. जिल्हा शासकीय रुग्णालय - 79
3. कृष्णा हॉस्पीटल, कराड- 86
4. खाजगी हॉस्पीटल- 1
5. कोरोना नमुने घेतलेले- 166
6. कोरोना बाधित अहवाल - 3
7. कोरोना अबाधित अहवाल - 105
8. अहवाल प्रलंबित - 58
9. डिस्चार्ज दिलेले- 105
10. सद्यस्थितीत दाखल- 61
11. आलेली प्रवाशी संख्या - 578
12. होम क्वारंटाईन व्यक्ती - 578
13. पैकी 14 दिवस पूर्ण झालेले - 422