कराड (सातारा) - पाटण तालुक्यातील कोयनानगरमध्ये 11 डिसेंबर 1967 रोजी पहाटे झालेल्या 6.7 रिश्टर स्केलच्या विनाशकारी भूकंपाला आज 54 वर्षे पूर्ण होत आहेत. या 54 वर्षांमध्ये कोयना प्रकल्पाच्या भूकंप मापन केंद्रावर 1 लाख 21 हजार भूकंपाचे धक्के नोंदले गेले आहेत.
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरची मोठी आपत्ती संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरची मोठी आपत्ती -
कोयना धरणाच्या परिसरातील 1967 च्या भूकंपामध्ये पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील सुमारे पाचशे गावांना मोठी झळ बसली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरची मोठ्या नैसर्गिक आपत्तीपैकीच ही एक आपत्ती होती. त्या भूकंपामुळे कराड, पाटण आणि चिपळूण परिसराची मोठी वाताहत झाली.
लोक साखर झोपेत असताना 11 डिसेंबर 1967 रोजी पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी 6.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला. भूकंपाने घरे पत्त्यासारखी कोसळली. अनेक लोक त्याखाली गाडले गेले. सुमारे 200 लोकांचा भूकंपात बळी गेला, तर दोन हजारहून अधिक लोक जायबंदी झाले. कोयना प्रकल्पातील बांधकामे सुध्दा उध्दवस्त झाली होती.
कोयनेतील विनाशकारी भूकंपाला 54 वर्षे पूर्ण लहान-मोठ्या भूकंपाची मालिका कायम...
कोयना धरण परिसरात गेल्या 54 वर्षांत लहान-मोठ्या भूकंपाची मालिका सुरूच आहे. तेव्हापासून कोयना धरण प्रकल्पाच्या भूकंप मापन केंद्रावर 1 लाख 21 हजार भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. हे सर्व धक्के मोठे, सौम्य आणि अतिसौम्य या प्रकारातील आहेत.
भूकंपाने घरे पत्त्यासारखी कोसळली सुमारे 200 लोकांचा भूकंपात बळी हेही वाचा -जम्मू-काश्मीर सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन; पाकिस्तानचे पाच सैनिक ठार!