महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Major Action By The State Excise Department : सातार्‍यात 53 लाखांचा दारूसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई - वैभव वैद्य

गोव्याहून राजस्थानकडे नेण्यात येणारा गोवा बनावटीचा मोठा दारूसाठा ( Large stock of Goa-Made Liquor ) उत्पादन शुल्क विभागाच्या ( Excise Department ) भरारी पथकाने जप्त ( Seizure of Liquor ) केला आहे. उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त ( Kolhapur Divisional Deputy Commissioner ) एच. बी. तडवी ( H. B. Tadavi ) आणि सातारा विभागाचे अधीक्षक ( Superintendent of Satara Division ) वैभव वैद्य ( Vaibhav Vaidya ) यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने खोडद (ता. सातारा) गावच्या हद्दीत पुणे-बंगळुरू महामार्गवरील हॉटेल राजपुरोहितसमोर कारवाई

Confiscation of counterfeit liquor
बनावटीचा दारूसाठा जप्त

By

Published : Jun 28, 2022, 12:17 PM IST

गोवा : गोव्याहून राजस्थानकडे नेण्यात येणारा गोवा बनावटीचा मोठा दारूसाठा ( Large stock of Goa-Made Liquor ) उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त ( Seizure of Liquor ) केला आहे. दारूच्या बाटल्यांची 750 बॉक्स, आयशर टेम्पो, दोन मोबाईल आणि दारूचे बॉक्स लपविण्याासाठी वापरलेल्या काजू टरफलांच्या 47 गोणी, असा 53 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल हाती लागला आहे. उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त ( Kolhapur Divisional Deputy Commissioner ) एच. बी. तडवी ( H. B. Tadavi ) आणि सातारा विभागाचे अधीक्षक ( Superintendent of Satara Division ) वैभव वैद्य ( Vaibhav Vaidya ) यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने खोडद (ता. सातारा) गावच्या हद्दीत पुणे-बंगळुरू महामार्गवरील हॉटेल राजपुरोहितसमोर कारवाई करीत गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त केला.

गोवा बनावटीचा मोठा दारूसाठा जप्त : सातारा-गोव्याहून राजस्थानकडे नेण्यात येणारा गोवा बनावटीचा मोठा दारूसाठा उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला आहे. दारूच्या बाटल्यांची 750 बॉक्स, आयशर टेम्पो, दोन मोबाईल आणि दारूचे बॉक्स लपविण्याासाठी वापरलेल्या काजू टरफलांच्या 47 गोणी, असा 53 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल हाती लागला आहे. याप्रकरणी मध्य प्रदेशच्या दोघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. मुकेश मोहनलाल सिसोदिया (रा. खजुरिया, इंदूर) आणि जितेंद्र भरतसिंग राठोड (रा. मेथवाडा, इंदूर), अशी त्यांची नावे आहेत.

उत्पादन शुल्कची मोठी कारवाई :उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने खोडद (ता. सातारा) गावच्या हद्दीत पुणे-बंगळुरू महामार्गवरील हॉटेल राजपुरोहितसमोर कारवाई करीत गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त केला. गोव्यावरून राजस्थानला जाणारी बेकायदेशीरपणे गोवा बनावटीच्या विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला. याप्रकरणी इंदोरच्या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दारू लपविण्यासाठी काजूच्या टरफलांचा वापर :उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत 180 मि. ली. च्या विदेशी दारुच्या एकूण 360 बाटल्यांचे 750 बॉक्स, एक सहाचाकी आयशर टेम्पो, दोन मोबाईल आणि दारुचे बॉक्स लपवण्यासाठी वापरलेल्या काजू टरपलांच्या 47 गोणींसह 53 लाख 29 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. भरारी पथकातील निरीक्षक एन. पी. क्षीरसागर, निरीक्षक संजय साळवी, दुय्यम निरीक्षक किरण बिरादार, जवान रोहीत माने, महेश मोहिते, नितीन जाधव, सचिन खाडे, संतोष निकम, अजित रसाळ, जीवन शिर्के, किरण जंगम, भीमराव माळी, विनोद बनसोडे, राणी काळोखे यांनी ही कारवाई केली. सातारा विभागाचे प्रभारी निरीक्षक एन. पी. क्षीरसागर हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

हेही वाचा :Foreign Liquor Seized : नाशकात 14 लाखांची विदेशी दारु जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details