सातारा :कोयना धरणांतर्गत विभागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर आदी बहुतांशी ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस अधूनमधून पडत असल्याने धरणात प्रतिसेकंद सरासरी 4829 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात संथगतीने वाढ होत असून सध्या धरणात 51.27 टि. एम. सी. उपलब्ध पाणीसाठा झाला आहे.
सातारा : कोयना धरणात 51.27 टीएमसी पाणीसाठा - koyna dam water ratio news
कोयना धरणातंर्गत विभागात तुरळक असा हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत असल्याने धरणात प्रतिसेकंद सरासरी 4829 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. त्याचवेळी पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी पाणीवापर कमी होत आहे तर पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले असल्याने येणाऱ्या पाण्यावर धरण पाणीसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे.
जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने पाणी साठ्याबाबतची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील धरणे भरण्याच्या दृष्टीने ऑगस्ट-सप्टेंबर या काळातील पाऊस उपयुक्त असतो. मात्र, जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने धरणातील पाणीसाठ्याची परिस्थिती जैसे थे आहे. तर, कोयना धरणातंर्गत विभागात तुरळक असा हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत असल्याने धरणात प्रतिसेकंद सरासरी 4829 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. त्याचवेळी पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी पाणीवापर कमी होत आहे तर पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले असल्याने येणाऱ्या पाण्यावर धरण पाणीसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे. धरणात आता एकूण उपलब्ध पाणीसाठा 51.27 टिएमसीपैकी उपयुक्त साठा 46.27 टिएमसी, पाणीउंची 2108.8 फूट, जलपातळी 642.722 मिटर इतकी झाली आहे. एक जूनपासून आजपर्यंतचा एकूण पाऊस पुढीलप्रमाणे कोयना 1703 मिलीमीटर, नवजा 1870 मिलीमीटर व महाबळेश्वर 1839 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.