सातारा- कोरोनाचा धसका आता संपूर्ण जगाने घेतला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची घोषित करण्यात आला आहे. लॉडाऊनच्या परिस्थितीत शाळांना सुट्टी आहे. 'स्टडी फ्रॉम होम' या संकल्पनेतून शिक्षण सुरू आहे. या पार्श्वभमीवर आता मुलांचे खेळणेही घरातच सुरू आहे. पारंपरिक खेळांबरोबर नवनवीन खेळही कुटुंबातील सदस्य मुलांसोबत खेळताना दिसत आहेत. दरम्यान, रुचिता क्षीरसागर या 5 वर्षीय चिमुकलीने 'घरा'च्या खेळातून 'स्टे अॅट होम'चा संदेश दिला आहे. तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बारामतीच्या अनंत इंग्लिश स्कूलमध्ये छोट्या गटात शिकणाऱ्या या बालिकेने आपल्या वडीलांकडे हट्ट धरून 2 महिन्यांपूर्वी घराचे साहित्य विकत घेतले. आणि तंबूवजा घर बनविण्याचा आपला हट्ट सरावाने पूर्ण केला. 'घर बन गया मेरा' असे लडिवाळपणे ती घरातील व शेजारील लोकांना आनंदाने सांगायची. दूरचित्रवाहिन्यांवरील बातम्या, परिवारातील चर्चा आणि लोकांचे बदलेलेले वागणे पाहून कोरोना म्हणजे काहीतरी भयंकर आहे. त्यापासून दूर राहण्यासाठी आपण घरात बंदिस्त झाल्याची जाणीव तिला झाली. त्यातून तिच्या खेळात 'कोरोना' आला.