सातारा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 23 मार्चपासून आजपर्यंत लॉकडाऊनचा उल्लंघन केल्याच्या तब्बल 12 हजार 253 घटनांची नोंद झाली असून 465 जणांवर गुन्हे दाखल झाले आहे. या काळात करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईत मोटारवाहन कायद्यासह एकुण 31 लाख 71 हजार 400 इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात लॉकडाऊनचे उल्लंघन; 465 गुन्हे दाखल, सुमारे 32 लाखांचा दंड वसूल - lockdown news
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 23 मार्चपासून आजपर्यंत लॉकडाऊनचा उल्लंघन केल्याच्या तब्बल 12 हजार 253 घटनांची नोंद झाली असून 465 जणांवर गुन्हे दाखल झाले आहे. या काळात करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईत मोटारवाहन कायद्यासह एकुण 31 लाख 71 हजार 400 इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
![सातारा जिल्ह्यात लॉकडाऊनचे उल्लंघन; 465 गुन्हे दाखल, सुमारे 32 लाखांचा दंड वसूल सातारा मुख्यालयसातारा मुख्यालय](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6756046-thumbnail-3x2-str.jpg)
सातारा पोलीस मुख्यालय
याबाबतची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. लॉकडाऊनचे उल्लंघन केलेल्या विविध कारवायांमध्ये एकूण 81 जणांना अटक करण्यात आली असून आजपर्यंत 2 हजार 549 वाहने जप्त करण्यात आली आहेत. यात १०० हून अधिक चारचाकी वाहनांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात वाहन जप्तीचा धडाका सुरूच राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Last Updated : Apr 11, 2020, 10:04 PM IST