सातारा- जिल्ह्यातील कराडचे 44 जण हज यात्रेसाठी गेले होते. ते सर्वजण इराणची राजधानी तेहरानमध्ये अडकले आहेत. कोरोना व्हायरसमुळे विमान रद्द झाल्यामुळे यात्रेकरूंची कोंडी झाली आहे. त्यांना परत आणण्यासाठी सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी परराष्ट्र मंत्र्यांशी संपर्क साधला आहे.
कोरोना इफेक्ट : कराडमधील 44 हज यात्रेकरू अडकले तेहरानमध्ये - कोरोना
सातारा जिल्ह्यातील कराडचे 44 जण हज यात्रेसाठी गेले होते. कोरोना व्हायरसमुळे विमान रद्द झाल्यामुळे इराणची राजधानी तेहरानमध्ये अडकले आहेत.
तेहरानमध्ये अडकलेल्या यात्रेकरूंपैकी एस. एस. मोमीन यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी संपर्क साधून आम्हाला येथून मायदेशी नेण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती केली आहे. त्यानंतर खासदार पाटील यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच खासदार पाटील हे स्वतः परराष्ट्र मंत्रालयात जाऊन पुढील कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत.
हेही वाचा -...म्हणून वीर जीवा महालांच्या वारसांनी मानले 'ईटीव्ही भारत'चे आभार