महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कराड उपविभागातील दोन अधिकाऱ्यांसह ४० पोलीस कोरोनाबाधित - Police tested corona positive

कराड पोलीस उपविभागात मोडणार्‍या कराड शहर, ग्रामीण, तळबीड आणि उंब्रज पोलीस ठाण्यातील २ अधिकारी आणि ३८ पोलिसांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये कराड शहर पोलीस ठाण्यातील बाधित कर्मचार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ठाणे अंमलदारास व्हरांड्यात बसविण्यात आले असून केवळ तक्रारदार-सामनेवाला यांनाच पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारातून आत सोडले जात आहे.

कराड उपविभाग
कराड उपविभाग

By

Published : Jan 25, 2022, 12:03 PM IST

सातारा- कराड पोलीस उपविभागात मोडणार्‍या कराड शहर, ग्रामीण, तळबीड आणि उंब्रज पोलीस ठाण्यातील २ अधिकारी आणि ३८ पोलिसांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये कराड शहर पोलीस ठाण्यातील बाधित कर्मचार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ठाणे अंमलदारास व्हरांड्यात बसविण्यात आले आहे.

ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने होत असून शासकीय अधिकारी आणि कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या कराड पोलीस उपविभागात मोडणार्‍या कराड शहर, ग्रामीण, तळबीड आणि उंब्रज पोलीस ठाण्यातील २ अधिकारी आणि ३८ पोलिसांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये कराड शहर पोलीस ठाण्यातील बाधित कर्मचार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ठाणे अंमलदारास व्हरांड्यात बसविण्यात आले असून केवळ तक्रारदार-सामनेवाला यांनाच पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारातून आत सोडले जात आहे.

ठाणे अंमलदार आता व्हारांड्यात -

कराड शहर पोलीस ठाण्यात कोरोनाचा कहर झाला आहे. पोलीस ठाण्यातील दोन उपनिरीक्षक आणि 26 पोलीस कोरोनाबाधित आहेत. ओमायक्रॉनचा प्रसार झपाट्याने होत आहे. लक्षणे सौम्य आहेत. परंतु, आजारी पडण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे पोलिसांना टेस्ट करण्यास सांगण्यात आले आहे. टेस्ट करणारे पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने बाधित आढळून येत आहेत. त्यामुळे कराड शहर पोलीस ठाणे कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. सध्या ठाणे अंमलदार (प्रभारी) असणार्‍या कर्मचार्‍यास नागरीकांच्या तक्रारी नोंदवून घेण्यासाठी व्हरांड्यात बसविण्यात आले आहे.

पोलीस ठाण्यात तक्रारदारांनाच प्रवेश -

एरवी पोलीस ठाण्यात कोणीही ये-जा करत होते. परंतु, कोरोनामुळे केवळ तक्रारदार आणि सामनेवाला यांनाच प्रवेश दिला जात आहे. लस घेतलेल्यांना तसेच ज्यांचे तातडीचे काम आहे, अशा नागरीकांनाच प्रवेशद्वारातून आत सोडण्यात येत आहे. नाहक पोलीस ठाण्यात येणार्‍यांना अटकाव करण्यात येत आहे. त्यामुळे कराड शहर पोलीस ठाण्यातील नेहमीचा गजबजाट बंद झाला आहे.

2 अधिकारी, 38 कर्मचारी बाधित -

कराड शहर पोलीस ठाण्यातील दोन उपनिरीक्षकांसह 38 पोलीस कर्मचार्‍यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे सौम्य आहेत. परंतु, सर्वजण होम क्वॉरंटाईन झाले आहेत. साहजिकच कर्मचार्‍यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अन्य कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडला आहे. सध्या सर्वच कर्मचार्‍यांना कोरोना चाचणी करून घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे नजीकच्या काही दिवसांत कोरोनाबाधित कर्मचार्‍यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

कराडचे प्रांताधिकारीही पॉझिटिव्ह -

कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ते होम क्वॉरंटाईन झाले आहेत. त्यांचा कार्यभार पाटण प्रांताधिकार्‍यांकडे देण्यात आला आहे. नुकतीच पाटण नगरपंचायतीची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत कराडचे प्रांताधिकारी दिघे हे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी होते. निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. यामुळे महत्वाच्या दाखल्यांवर सह्या घेण्यासाठी कराड प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांना पाटणला हेलपाटे मारायची वेळ आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details