सातारा - जिल्ह्यात आज (शनिवार) कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यातील 40 जणांच्या चाचण्या आज पॉझिटिव्ह आल्या आहेत. यातील बहुतांश जण बाहेरच्या जिल्ह्यातून प्रवास करुन आलेले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 241 झाली असून मृतांचा आकडा 6 झाला आहे. याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान, एकाच दिवशी 40 रुग्ण आढळून आल्याने, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबईमधून आलेला कराड तालुक्यातील बाचोली येथील 47 वर्षीय पुरुष, जळगावमधून आलेला उंब्रज येथील 58 वर्षीय पुरुष, मुंबईमधून आलेला गमेवाडी (ता. पाटण) येथील 27 व 20 वर्षीय युवक, मुंबईमधून आलेला बहुलेकरवाडी (ता. पाटण) येथील 60 वर्षीय पुरुष, मुंबईमधून आलेली कोरेगाव येथील 40 वर्षीय महिला, शिरताव (ता. माण) येथील 25 वर्षीय तरुण, शिरताव (ता. माण) येथील 28 वर्षीय तरुण, कोळकी (ता. फलटण) येथील 34 व 60 वर्षीय महिला, 9 वर्षांची दोन बालके, जकातवाडी (ता. सातारा) येथील 27 वर्षीय तरुण, शाहूपुरी (ता. सातारा) येथील 29 वर्षीय तरुण व 52 वर्षीय महिला, धनवडेवाडी (ता. सातारा) येथील निकट सहावासित 36 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
तसेच घारदरे (ता. खंडाळा) येथील 51 वर्षीय पुरुष, येळेवाडी (ता. खंडाळा) येथील 70 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला वासोली (ता. वाई) येथील 47 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला पिंपोडे (ता. कोरेगाव) येथील 55 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली पारगाव खंडाळा येथील 44 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, म्हासोली (ता. कराड) येथील 37 वर्षीय महिला, पाटण येथील निकट सहवासित तब्बल 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
लोधवडे (ता. माण) येथील 67 वर्षीय पुरुषाचा यापुर्वीच मृत्यु झाला आहे. त्यांचा मृत्यु कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. मलकापूर (ता. कराड) येथील 49 वर्षीय पुरुष पूर्वीच पॉझिटिव्ह असून दहा दिवसांच्या तपासणी नंतरही पॉझिटिव्ह आला आहे, असे डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या 241 झाली असून यापैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 121 इतकी आहे. कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 114 आहे. तर आत्तापर्यंत या कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे.