महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कराड तालुक्यात मोटारींचा भीषण अपघात; ३ पैलवानांसह ४ ठार, ९ जखमी - wrestler death accident Pachwad

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड फाटा (ता. कराड) हद्दीत दोन मोटारींच्या भीषण अपघातात ४ जण ठार, तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

Karad taluka accident
पाचवड फाटा वाहन अपघात

By

Published : Jan 31, 2021, 10:40 PM IST

सातारा -पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड फाटा (ता. कराड) हद्दीत दोन मोटारींच्या भीषण अपघातात ४ जण ठार, तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमधील ३ व्यक्ती हे पैलवान होते. कोकणात पर्यटन करून कोल्हापूरमार्गे पुण्याकडे जाताना हा भीषण अपघात झाला. ईनोवा कारमधील पाच आणि स्विफ्ट कारमधील चौघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त वाहने

ABOUT THE AUTHOR

...view details