महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बदली आदेश घेऊन परतताना कार आदळली ट्रकवर; ४ शिक्षक जखमी - ट्रक

प्राथमिक शिक्षक आपला बदलीचा आदेश घेऊन परत जाताना त्यांची कार ओव्हरटेक करताना ट्रकवर आदळली. यावेळी झालेल्या अपघातात ४ शिक्षक जखमी झाले.

घटनास्थळ

By

Published : Jun 17, 2019, 11:25 AM IST

सातारा- बदली आदेश घेऊन परत जाताना झालेल्या कार-ट्रकच्या अपघातात 4 शिक्षक गंभीर जखमी झाले. ही घटना दहिवडी-फलटण मार्गावरील बिजवडी येथील बॉम्बे रेस्टॉरन्टजवळ घडली. प्रमोद विश्वास निंबाळकर, हणमंत दत्तू गडकरी, सुजाता हणमंत गडकरी, शालन मोरे असे जखमी शिक्षकांची नावे आहेत. अपघातग्रस्त शिक्षक हे फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील रहिवासी आहेत.


माण तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक आज आपले बदली आदेश घेण्यासाठी दहिवडी पंचायत समितीत आले होते. बदली आदेश घेऊन परत फलटणकडे जाताना अर्टिगाने (एमएच 12, एलजे - 5388 ) ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या ट्रक (एमएच 12 एफसी 7151) या ट्रकवर जाऊन आदळल्याने अपघात झाला. या धडकेत कारमध्ये बसलेले प्रमोद विश्वास निंबाळकर (वय-45), हणमंत दत्तू गडकरी (वय-55), सुजाता हणमंत गडकरी (वय-53), शालन मोरे हे चारही शिक्षक जखमी झाले. हणमंत गडकरी व सुजाता गडकरी गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित करत आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details