कराड (सातारा) - कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर येथे चोवीस तासात एकूण 390 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कोयना धरण परिसरात चोवीस तासात 390 मिलीमीटर पाऊस
कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर येथे चोवीस तासात एकूण 390 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या चोवीस तासात (आज सकाळी 8 वाजेपर्यंत) कोयनानगर 142 मिलीमीटर, नवजा येथे 122 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 126 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे कोयना धरणात प्रति सेकंद 49,604 क्युसेस पाण्याची आवक होत आहे. मुसळधार पावसामुळे कोयना धरणाची पाणी पातळी 635.73 मीटर आणि धरणातील पाणीसाठा 35.13 टीएमसी झाला आहे. कराड येथील कोयना पुलाजवळ नदीच्या पाण्याची पातळी 19.6 फूट झाली आहे. कोयना पुलाची इशारा पातळी 45 फूट, तर धोक्याची 58 फूट ही धोका पातळी आहे. त्यामुळे सध्या तरी कराडकरांना नदीच्या पाण्याचा धोका नाही. पाटणच्या केरा पुलाजवळ पाण्याची पातळी 567.20 मीटर, तर हेळवाक पुलाजवळची पाणी पातळी 574 मीटर झाली आहे.
हेही वाचा -पुणे: मायलेकाच्या खुनप्रकरणातील संशयित आबिद शेखचा मृतदेह सापडला