सातारा -कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या ३३ जणांना आज कृष्णा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. कराडमधील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, कराडमध्ये आज (रविवार) एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेला नाही.
कोरोना : कराडमधील ३३ जण विलगीकरण कक्षात... - corona news
कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या ३३ जणांना आज कृष्णा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. कराडमधील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.
करामधील ३३ जण विलगीकरण कक्षात
प्रशासनाने कराड, मलकापूसह परिसरातील गावे पूर्णपणे बंद केली आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. रविवारी ३३ जणांना कृष्णा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.