महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा : टेंभुच्या पाण्यासाठी 32 गावांची कुकुडवाड येथे पाणी परिषद

माण तालुक्यातील कुकुडवाड व पुकळेवाडी यांसोबत सोळा गावे, तर खटाव तालुक्यातील सोळा गावे अशी एकूण 32 गावांना टेंभू उपसा जलसिंचन योजनेतून शेती व पिण्यासाठी पाणी मिळावे या मागणीसाठी 20 जुलै रोजी कुकुडवाड येथे पाणी परिषदेचे आयोजन केले आहे.

टेंभुच्या पाण्यासाठी 32 गावांची कुकुडवाड येथे पाणी परिषद

By

Published : Jul 20, 2019, 2:04 PM IST

सातारा - माण व खटाव तालुक्यातील 32 गावांना टेंभू उपसा जलसिंचन योजनेतून शेती व पिण्यासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी 20 जुलै रोजी कुकुडवाड येथे पाणी परिषदेचे आयोजन केले आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या गावांना पाणी देण्याचा शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी या पाणी परिषदेमार्फत करण्यात आली आहे.

माण तालुक्यातील कुकुडवाड व पुकळेवाडी यांसोबत सोळा गावे, तर खटाव तालुक्यातील सोळा गावे अशी एकूण 32 गावे शासनाच्या दुष्कळग्रस्तांसाठी राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेत समाविष्ट नाहीत. दुष्काळी भागासाठी असणाऱ्या व माण, खटाव तालुक्यातून जाणाऱ्या उरमोडी, जिहे-कटापूर, टेंभू या प्रकल्पांत ३२ पैकी एकाही गावाचा समावेश नसल्याने गावे सतत दुष्काळाने होरपळत आहेत. जुलै महिन्याच्या मध्यावर पावसाचा थेंबही या भागात पडलेला नाही. तसेच दरवर्षी पावसाचे प्रमाण प्रचंड कमी होत असल्याने पाणी हे या भागात चिंतेची बाब बनली आहे.

टेंभुच्या पाण्यासाठी 32 गावांची कुकुडवाड येथे पाणी परिषद

दुष्काळी भागासाठी असलेल्या टेंभू योजनेतून या दोन्ही तालुक्यातील वंचित गावांना पाणी देणे शक्य आहे. परंतु, आजपर्यंत या गावाचा शासनाने सकारात्मक विचार केलेला नसल्याने ही ३२ गावे पाण्यापासून कायम वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे या ३२ गावांतील नागरिकांनी एकत्र येऊन टेंभू उपसा जलसिंचन योजनेतून पाणी मिळवण्यासाठी तिसऱ्या एल्गार परिषदेचे कुकुडवाड येथे आयोजन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details